IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघ काळ्या पट्ट्या बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या कारण

IND vs ENG 2nd Test Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून बर्मिंगहॅम येथे सुरू झाला आहे. जिथे इंग्लिश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने या सामन्यात ३ बदल केले आहेत. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ आणि इंग्लिश संघ काळ्या पट्ट्या घालून मैदानात उतरले. हे पाहून सर्व चाहते आश्चर्यचकित झाले. मात्र, आता याचे कारण स्पष्ट झाले आहे. दोन्ही संघांनी एका दिग्गज खेळाडूच्या सन्मानार्थ काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत.
दोन्ही संघ काळ्या पट्ट्या बांधून का उतरले मैदानात –
बर्मिंगहॅम येथे कसोटी सामन्या पहिल्या दिवशी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघ काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर प्रवेश केला. इंग्लंडचे माजी खेळाडू वेन लार्किन्स यांच्या स्मरणार्थ दोन्ही संघांनी हा सन्मान व्यक्त केला. २८ जून २०२५ रोजी वेन लार्किन्स यांचे निधन झाले होते. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी राष्ट्रगीतानंतर दोन मिनिटांचे मौन पाळले.
Both England and India players wear black armbands and observe a minute’s silence as a tribute to former cricketer Wayne Larkins, who passes away at 71. 🏏
📸: JioHotstar/X#oneturfnews #engvsind #teamindia #england #testcricket #cricket pic.twitter.com/VBf1nGCx2u
— OneTurf News (@oneturf_news) July 2, 2025
वेन लार्किन्स, ज्यांचा जन्म १९५३ मध्ये झाला होता, यांनी इंग्लंडसाठी १३ कसोटी आणि २५ एकदिवसीय सामने खेळले होते. यापूर्वी लीड्स येथील कसोटी सामन्यादरम्यानही दोन्ही संघांना तीन दिवस काळ्या पट्ट्या बांधून खेळावे लागले होते.
हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंतसह 10 स्टार खेळाडूंवर लागणार बोली; IPL नंतर ‘या’ लीगमध्ये चमकणार
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड आणि भारताची प्लेइंग इलेव्हन:
भारत: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नीतीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.
इंग्लंड: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.





