IND vs BAN 1st Test : चेन्नईत पहिल्याच दिवशी ‘हा’ स्टार खेळाडू ठरला फ्लॉप, खाते न उघडताच परतला तंबूत…

IND vs BAN 1st Test (Shubman Gill) : भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु झाला आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली.
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला पण हसन महमूदने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने भारताला पहिला धक्का दिला. हसनने रोहित शर्माच्या रूपाने पहिला बळी घेतला. भारतीय कर्णधार केवळ 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
Shubman Gill dismissed for a 8 ball duck. pic.twitter.com/tc4UP7Kzo0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 19, 2024
यानंतर फलंदाजीला आलेल्या शुभमन गिलकडून सगळ्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण घडले त्याच्या उलट. गिलने 8 चेंडूंचा सामना केला पण त्याला खातेही उघडता आले नाही आणि तो यष्टीमागे लिटन दासच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. गिल यंदा घरच्या मैदानावर तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. अशाप्रकारे गिलने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
गिल आता घरच्या मैदानावरील कसोटीत एका कॅलेंडर वर्षात 3 किंवा अधिक शून्यावर बाद होणारा सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी 2021 मध्ये कोहली घरच्या मैदानावरील कसोटीत तीनदा शून्यावर बाद झाला होता.
AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्ताननं केला मोठा उलटफेर, दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट्सने उडवला धुवा…
देशांतर्गत कसोटींमध्ये एका कॅलेंडर वर्षात 3 किंवा त्याहून अधिक वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय (टॉप7) : मोहिंदर अमरनाथ (1983), मन्सूर अली खान पतौडी (1969), दिलीप वेंगसरकर (1979),विनोद कांबळी (1994),विराट कोहली (2021), शुभमन गिल (2024)





