IND vs AUS : टिम डेव्हिडने गगनचुंबी षटकार ठोकत रचला इतिहास! तब्बल इतक्या मीटरचा लगावला सिक्स, पाहा VIDEO

Tim David Longest Six Video Viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टिम डेव्हिडने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. उजव्या हाताच्या या फलंदाजाने अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक झळकावले. यासह त्याने १२९ मीटर लांब गगनचुंबी षटकार लगावून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लांब षटकाराचा विक्रम आपल्या नावे केला. या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टिम डेव्हिडने उत्तुंग षटकार ठोकत रचला इतिहास –
ऑस्ट्रेलियन डावाच्या सातव्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजीला आला होता. अक्षरने फुल लेंग्थ चेंडू टाकला, मात्र तो चेंडू डेव्हिडने उत्तुंग षटकारासाठी धाडली. जो चेंडू थेट होबार्ट स्टेडियमच्या छतावर जाऊन पडला! हा षटकार १२९ मीटर लांब होता, जो ११० किंवा १२० मीटर नव्हे तर थेट इतिहासातील सर्वात लांब ठरला. या षटकात डेव्हिडने आणखी एक षटकार खेचला. स्वत:च्या या प्रहाराला पाहून डेव्हिडही अवाक् झाला.
View this post on Instagram
अवघ्या २३ चेंडूत झळकावले अर्धशतक –
Tim David hitting 129 meters six, what kind of monster he is😭 pic.twitter.com/sCjaAmhv6P
— TukTuk Academy (@TukTuk_Academy) November 2, 2025
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या टिम डेव्हिडने आपल्या आक्रमक फलंदााजीने सर्वांचे लक्ष्य वेधलं. यानंतर पुढच्याच षटकात शिवम दुबेच्या गोलंदाजीवर त्याने जोरदार हल्लाबोल केला. या षटकात तीन चौकारांसह त्याने फक्त २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस शिवम दुबेनेच डेव्हिडला बाद करत त्याची खेळी संपुष्टात आणली. डेव्हिडने ३८ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७४ धावा फटकावल्या.
हेही वाचा – IND A vs SA A : ऋषभ पंतचे दमदार कमबॅक अन् कोटियनचा ऑलराऊंड डंका! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ३ विकेट्सनी विजय
डेव्हिडने नोंदवला आणखी एक खास विक्रम –
या खेळीदरम्यान डेव्हिडने आणखी एक खास विक्रम नोंदवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा टप्पा त्याने पार केला. अवघ्या ९३१ चेंडूत हा पराक्रम करणारा तो सर्वात जलद ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. जगात ७८९ चेंडूत १०० टी-२० षटकार मारणाऱ्या एविन लुईसनंतर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेव्हिडच्या या वादळी खेळीने होबार्टचे मैदान थरारले असून, मालिकेतील हा सामना आणखी रोमांचक झाला आहे.





