IND vs AUS : गिल-वॉशिंग्टनच्या जोरावर भारताचा ‘सुंदर’ विजय, ऑस्ट्रेलिया धुव्वा उडवत मालिकेत २-१ ने घेतली आघाडी

IND vs AUS India beat Australia by 48 runs : क्वीन्सलँड येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी धुव्वा उडवला. यासह भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १६७ धावा करत आस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात यजमान ऑस्ट्रेलिया संघ १८.२ षटकांत ११९ धावांत गारद झाला. भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ४६ धावांचे योगदान दिले, तर गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदरने ३ विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
शुबमन गिलचे सर्वाधिक ४६ धावांचे योगदान –
या सामन्यात शुबमन गिलने भारताकडून सर्वाधिक ४६ धावा केल्या. मात्र, या डावात एकाही भारतीय फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. गिलने काही आकर्षक फटके मारले, पण नॅथन एलिसने त्याला बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सलामीवीर अभिषेक शर्माने २८ धावा करून सुरुवात दिली, तर तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या शिवम दुबेने २२ धावांची छोटी खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने २००च्या स्ट्राइक रेटने २० धावा जोडल्या, तर अखेरीस अक्षर पटेलने ११ चेंडूंत २१ धावा कुटल्या.
Washington Sundar wraps things up in style 👌
A terrific performance from #TeamIndia as they win the 4⃣th T20I by 4⃣8⃣ runs. 👏👏
They now have a 2⃣-1⃣ lead in the #AUSvIND T20I series with 1⃣ match to play. 🙌
Scorecard ▶ https://t.co/OYJNZ57GLX pic.twitter.com/QLh2SRqW9U
— BCCI (@BCCI) November 6, 2025
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा भेदक मारा –
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि अॅडम झॅम्पा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. एलिसने गिल, दुबे आणि वॉशिंग्टन सुंदरला बाद केले, तर झाम्पाने अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि जितेश शर्माला बाद केले. झेवियर बार्टलेट आणि मार्कस स्टोइनिस यांना प्रत्येकी १ विकेट्स घेतली.
हेही वाचा – IND vs AUS : शिवम दुबेचा कहर! झाम्पाला ठोकला गगनचुंबी षटकार, चेंडू पोहोचला थेट स्टेडियमबाहेर, पाहा VIDEO
अक्षर पटेलचा ऑलराऊंड पराक्रम –
All-round brilliance ✨
Axar Patel is the Player of the Match for his highly crucial batting and bowling contributions 🙌
Scorecard ▶ https://t.co/OYJNZ57GLX#TeamIndia | #AUSvIND | @akshar2026 pic.twitter.com/69PGn45bxS
— BCCI (@BCCI) November 6, 2025
या सामन्यात भारताच्या विजयात हरफनमौला अक्षर पटेलची महत्त्वाची भूमिका राहिली. फलंदाजीमध्ये त्याने ११ चेंडूंत वेगवान २१ धावा केल्या, तर गोलंदाजीमध्ये मॅथ्यू शॉर्ट आणि जॉश इंग्लिसला बाद करत २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. या दमदार कामगिरीमुळे अक्षर पटेलला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
ऑस्ट्रेलिया संघ ११९ धावांवर गारद –
भारताच्या १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया ११९ धावांवर सर्वबाद झाली. कर्णधार मिचेल मार्शने २४ चेंडूंत ३० धावा करत सर्वाधिक योगदान दिले, तर सलामीवीर मॅथ्यू शॉर्टने २५ धावा केल्या. या दोघांखेरीज एकाही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला २० धावांचा टप्पा गाठता आला नाही.
वॉशिंग्टन सुंदरने घेतल्या सर्वाधिक विकेट्स –
✌️ in ✌️@Sundarwashi5 into the act now 😎
He also completes 5⃣0⃣ wickets in T20Is 👏
Updates ▶ https://t.co/OYJNZ57GLX #TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/exzSydL4dX
— BCCI (@BCCI) November 6, 2025
भारतीय गोलंदाजांमध्ये स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी २ विकेट्स मिळवल्या, तर अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी १ विके्स घेता आली.





