IND vs AUS : मिचेल मार्शची खेळी अभिषेकच्या अर्धशतकावर पडली भारी! ऑस्ट्रेलियाने भारताचा उडवला धुव्वा

IND vs AUS Australia beat India by 4 wickets : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्सनी बाजी मारली. मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर १८.४ षटकांत सर्वबाद १२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्शच्या शानदार खेळीच्या जोरावर १३.२ षटकांत ६ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याचबरोबर मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
भारताचा डाव: अभिषेक शर्माची झुंज, इतरांची निराशा
भारताची पारी अभिषेक शर्माच्या ३७ चेंडूंत ६८ धावांच्या खेळीवर अवलंबून होती. हर्षित राणाने ३५ धावा केल्या. मात्र, उर्वरित नऊ फलंदाजांपैकी कोणालाही दहा धावांचा आकडा गाठता आला नाही. यातील चार फलंदाज तर खातेही उघडू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवुडने ३ विकेट्स घेतले, तर जेवियर बार्टलेट आणि नॅथन एलिस यांना प्रत्येकी २ विकेट्स आणि मार्कस स्टॉइनिसने एक विकेट्स घेतली.
ऑस्ट्रेलियाचा डाव: मार्श-हेडची तूफानी सलामी –
१२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड यांनी धडाकेबाज सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. वरुण चक्रवर्तीने हेडला बाद करत ही जोडी फोडली. हेडने १५ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकारासह २८ धावा केल्या. मार्शचे अर्धशतक हुकले; त्याने २६ चेंडूंत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४६ धावा काढल्या. जोश इंग्लिसने २० धावा तर टिम डेविडने १ धावा केली.
हेही वाचा – IND vs AUS : अभिषेक शर्माने मेलबर्नमध्ये इतिहास रचला! मोडला मोहम्मद रिझवानचा मोठा विक्रम
जसप्रीत बुमराहची हुकली हॅट्ट्रिक हुकली –
सामन्यात जसप्रीत बुमराहचा जलवा दिसला. १३व्या षटकात त्याला हॅट्ट्रिकने हुलकावणी दिली. चौथ्या चेंडूवर मिचेल ओवेनला (१४ धावा) विकेटकीपर संजू सॅमसनच्या हाती झेलबाद केले. पाचव्या चेंडूवर मैथ्यू शॉर्टला यॉर्करवर क्लीन बोल्ड केले; शॉर्ट खाते उघडू शकला नाही. मात्र, मार्कस स्टोइनिसने नाबाद ६ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. भारताकडून बुमराह व्यतिरिक्त वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.





