IND vs AUS 4th Test (Melbourne) | मेलबर्नमध्ये 26 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजल्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने येतील. नाणेफेक याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 4.30 वाजता होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने बॉक्सिंग डे टेस्ट भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण भारताचे भारताने ही कसोटी गमावल्यास फायनलमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग कठीण होईल. जर टीम इंडियाने चौथ्या कसोटीसह या मालिकेतील उर्वरित सामना जिंकला तर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर त्यांना या सामन्यानंतर आणखी तीन सामने खेळायचे आहेत. भारताविरुद्ध एक आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ दोन सामने खेळण्यासाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. म्हणजे त्यांना अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी संधी मिळणार आहे. भारताविरूध्द ते पराभूत झाले तरी श्रीलंकेच्या दौऱ्यावर विजय मिळवून ते अंतिम फेरी गाठू शकतात. पावसाने ऐन वेळेस लावलेली हजेरी आणि तळाच्या फलंदाजानी दाखवलेली जिगर, या दोन गोष्टींच्या जोरावर भारताने ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळविले होते. असे असले तरी, सध्याच्या घडीला धावांसाठी झगडणाऱ्या रोहित शर्माच्या फलंदाजी क्रमाविषयी अजूनही अनिश्चितता आले. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सरावासाठी बाहेर पडलेला, भारतीय कर्णधार हा शेवटचा खेळाडू होता. सामना : भारत वि. ऑस्ट्रेलिया स्थळ : मेलबर्न क्रिकेट वेळ : पहाटे 5.00 पासून रोहित शर्माने ज्याप्रकारे सराव केला, त्या अनुशंघाने आतापर्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलच्या ऐवजी तो सलामीवीरांची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून आले आहे. कर्णधार रोहित शर्मा सलामीला आल्यास लोकेश राहुलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये शुभमन गिलला मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरावे लागेल अन्यथा त्याला ध्रुव जुरेलसाठी जागा रिकामी करावी लागणार आहे. पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. कर्णधार रोहित शर्माला2019 मध्ये सलामीवीर म्हणून उतरविण्यात आले होते, तेव्हापासून त्याने मधल्या फळीत खेळणे बंद केले होते. मात्र, फॉर्ममध्ये असलेला लोकेश राहुल व शतकी खेळी करणारा यशस्वी जैस्वाल यांच्यामुळे रोहितला सहाव्या क्रमांकावर खेळावे लागत आहे. रोहित शर्मा मधल्या फळीत अयशस्वी ठरला असून त्याने 3 डावांमध्ये केवळ 19 धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहित शर्मा सलामीला उतारला तर भारतीय फलंदाजीचा क्रम काय असेल, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. कर्णधार रोहित शर्माला या संदर्भात विचारणा केली असता, त्याने कोण कुठे फलंदाजी करेल याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. संघासाठी जे सर्वोत्तम असणार आहे, तेच आम्ही करणार असल्याचे त्याने म्हटले होते. मालिकेचा निकाल बदलण्याची मेलबर्नची क्षमता बॉर्डर-गावस्कर स्पर्धेतील 3 लढती झाल्या असून यामध्ये पर्थमध्ये भारताने, ऍडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळविला होता. ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिली होती. त्यामुळे अर्धी स्पर्धा संपल्यावर देखील दोन्ही संघांनी मालिकेत बरोबरी केली असल्याने स्पर्धा खडतर असल्याचे दोन्ही कर्णधारांचे मत आहे. मात्र, मेलबर्न येथील कसोटीनंतर हे चित्र बदलण्याची शक्यता असल्याचे दोन्ही कर्णधार मान्य करतात. ऑस्ट्रेलियातील हे भारताचे आवडते मैदान आहे. या मैदानावर 2014 नंतर भारतीय संघ एकाही सामन्यात पराभूत झालेला नाही. भारताने मेलबर्न येथील शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. असे असले तरी यावेळी यशस्वी, ऋषभ व शुभमन हे युवा फलंदाज, चांगला सलामीवीर लोकेश राहुल व दिग्गज विराट कोहली व कर्णधार रोहित शर्मा यांच्यात आत्मविश्वास दिसून येत नाही. वेगवान माऱ्याल्या प्रत्युत्तर द्यावेच लागेल ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्वीसारखा प्रबळ दावेदार दिसून येत नसला तरी देखील भारताला मेलबर्नमध्ये विजयी मोहीम सुरू ठेवायाची असले तर फलंदाजाना सर्वोत्तम कामगिरी करावीच लागणार आहे. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीसमोर विराट कोहलीला पाय रोवून उभे राहावेच लागणार आहे. यासाठी संयमाची आवश्यकता आहे. जोश हेझलवूडच्या अनुपस्थितीत स्कॉट बोलंड लाईन आणि लेन्थवर माराकरून भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. त्यामुळे जैस्वाल, गिल आणि पंत यांना त्यांच्यावर असणाऱ्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागणार असून कर्णधार रोहितला देखील कोणतेही दडपण न घेता मैदानात उतरावे लागणार आहे. याचबरोबरीने येथील तापमान देखील जास्त असल्याने दुसरा फिरकी गोलंदाज देखील खेळविण्यात येवू शकतो. अशा वेळी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याच्यासाठी जागा कोण रिकामी करणार हे, देखील महत्वाचे ठरणार आहे. बुमराह – कॉन्स्टास कोण मारणार बाजी ? कसोटी पदार्पणासाठी सज्ज असलेला 19 वर्षीय सॅम कॉन्स्टास समोर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा सामना करावा लागणार आहे. हा सामना कसा रंगतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. पर्थ कसोटीतून पदार्पण करणाऱ्या नॅथन मॅकस्विनीला बुमराहने सातत्याने बाद केल्याने ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीला त्याला डच्चू देवून कॉन्स्टासला संघात घ्यावे लागले आहे. दरम्यान, भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या ट्रॅव्हिस हेड पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो मेलबर्न कसोटीसाठी सज्ज झाला आहे. हेड मालिकेत सर्वोत्तम कामगिरी करणारा फलंदाज ठरला आहे. IND vs AUS 4th Test : मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग-11 ची घोषणा, संघात केले दोन मोठे बदल… संघ खालीलप्रमाणे भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर, प्रसीद कृष्णा, हर्षित राणा, तनुष कोटियन, सरफराज खान, अभिमन्यू इसवरन, ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल. ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन लियॉन, मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलँड. Test Rankings 2024 : आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ, पंत अन् जयस्वालला बसला मोठा फटका… ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट मॅच म्हणजे काय..? ‘बॉक्सिंग डे’ हे नाव ऐकून तुम्हाला वाटत असेल की इथे बॉक्सिंगबद्दल बोलले जात असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बॉक्सिंग डेचा बॉक्सिंगशी काहीही संबंध नाही. ख्रिसमस नंतरचा दिवस (25 डिसेंबर) जगातील अनेक भागांमध्ये बॉक्सिंग डे म्हणून ओळखला जातो. क्रिकेट जगतात, ऑस्ट्रेलियामध्ये दरवर्षी या दिवशी कसोटी सामना सुरू होतो आणि त्याला ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ म्हणतात. ऑस्ट्रेलियाचा संघ या दिवशी मेलबर्न येथेच कसोटी सामना खेळतो. बॉक्सिंग डे टेस्ट हा एक सामना आहे जो दरवर्षी 26 डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी खेळला जातो. मेलबर्नमध्ये दरवर्षी बॉक्सिंग डे टेस्ट आयोजित केली जाते, परंतु आता बॉक्सिंग डे टेस्ट इतर देशांमध्ये आयोजित केली जाते. महत्वाची बाब म्हणजे बॉक्सिंग डेच्या दिवशी मेलबर्न क्रिकेट मैदान खचाखच भरलेले असते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका यांसारखे देश दरवर्षी बॉक्सिंग डे कसोटीने आपले वर्ष संपवण्याचा आणि नवीन वर्षाची सुरुवात नवीन वर्षाच्या कसोटीने करण्याचा प्रयत्न करतात.