IND vs AUS 4th Test : दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व, यशस्वी बाद होताच भारताचा डाव गडगडला; रोहित पुन्हा अपयशी…

India vs Australia 4th Test Day 2 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डाव 474 धावसंख्येवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारताने दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 164 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. ऋषभ पंत 6 तर रवींद्र जडेजा 4 धावांवर नाबाद राहिले.
भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाच गडी गमावून 164 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. या बाबतीत भारत अजूनही 310 धावांनी मागे आहे. दुसरा दिवस पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. तिन्ही सत्रात कांगारूंनी भारतीय संघावर वर्चस्व राखले.
Stumps on Day 2 in Melbourne!#TeamIndia move to 164/5, trail by 310 runs
Updates ▶️ https://t.co/njfhCncRdL#AUSvIND pic.twitter.com/9ZADNv5SZf
— BCCI (@BCCI) December 27, 2024
शेवटच्या सत्रात भारताच्या फलंदाजीवेळेस एकवेळ धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 153 धावा होती. यानंतर टीम इंडियाने सहा धावा करताना आणखी तीन विकेट गमावल्या आणि धावसंख्या पाच विकेट्सवर 159 धावा अशी झाली. भारताकडून यशस्वी जैस्वालने 82 धावांची दमदार खेळी केली. तर विराट कोहलीने 36 धावांचे योगदान दिले. कोहली आणि यशस्वी यांच्यात शतकी भागीदारी झाली. मात्र दोघे बाद होताच अवघ्या 30 मिनिटांत सामन्याचा चित्र पालटले. भारताने अतिशय झटपट 3 विकेट गमावल्या.
यशस्वी जैस्वालचा धावबाद हा टर्निंग पॉइंट ठरला. यशस्वीने कोहलीसोबत 102 धावांची भागीदारी केली. मात्र, यशस्वी धावबाद होताच भारताचा डाव गडगडला. प्रथम लगेचच विराट कोहली बाद झाला. त्यानंतर नाईट वॉचमन आकाश दीपही खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. तत्पूर्वी, सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा तीन धावा करून तर केएल राहुल 24 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव….
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 धावांवर संपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या तीन फलंदाजांनी (लॅबुशेन 72 ,उस्मान ख्वाजा 57,सॅम कॉन्टास 60) अर्धशतके झळकावली. यानंतर स्टीव्ह स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक झळकावले. स्मिथचे भारताविरुद्धच्या कसोटीतील 11वे शतक होते आणि यासह टीम इंडियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा तो फलंदाजही ठरला आहे. स्मिथ 140 धावा करून बाद झाला तर कर्णधार पॅट कमिन्सने 49 धावांची खेळी केली.
IND vs AUS 4th Test : पहिला दिवस यजमान ऑस्ट्रेलियाच्या नावावर, चार फलंदाजांनी झळकावली अर्धशतके…
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 बाद 311 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या दिवशी चार विकेट्स काढण्यासाठी भारतीय गोलंदाजांना मोठी कसरत करावी लागली. ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी 163 धावा जोडल्या आणि चार विकेट गमावल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट घेतल्या तर रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. आकाश दीपने दोन, तर सुंदरने एक विकेट घेतली.





