IND vs AUS 3rd Test | स्टीव्ह स्मिथनं रोहित शर्माचा मोठा विक्रम काढला मोडित, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला जगातील तिसरा खेळाडू…

IND vs AUS 3rd Test (Steven Smith) | बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सलग दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर गाब्बा येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथची बॅट अखेर जोरदार बोलली. त्याने भारताविरुद्ध शानदार शतक झळकावले आणि अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले. त्याने आता एका बाबतीत भारतीय कर्णधार रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन फलंदाजाने न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विल्यमसनचीही बरोबरी केली आहे.
रोहित शर्माचा मोडला विक्रम..
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर आहे. त्याने 64 सामन्यात 18 शतके झळकावली आहेत. दुस-या स्थानावर मार्नस लॅबुशेन आहे, ज्याने आतापर्यंत 11 शतके झळकावली आहेत.
आता या यादीत स्टीव्ह स्मिथचे नाव जोडले गेले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने आपले 10 वे शतक पूर्ण केले आहेत. केन विल्यमसनच्या नावावरही 10 शतके आहेत. या बाबतीत स्मिथने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 9 शतके झळकावणाऱ्या रोहित शर्माला मागे टाकले आहे. रोहित शर्माला 9 शतके झळकावण्यासाठी 39 सामने लागले, तर स्मिथला 10 शतके झळकावण्यासाठी 48 सामने खेळावे लागले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथ रोहित शर्मापेक्षा खूप पुढे आहे. स्मिथने आतापर्यंत 3606 धावा केल्या आहेत तर हिटमॅनला आतापर्यंत केवळ 2694 धावा करता आल्या आहेत. गाबा येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात स्मिथने 190 चेंडूत 12 चौकारांसह 101 धावांची खेळी खेळली.
IND vs AUS 3rd Test | जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, कपिल देवचा महान विक्रम काढला मोडित….
खराब फॉर्ममध्ये भारतीय कर्णधार…
रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. ऑस्ट्रेलियापूर्वी, हिटमॅनने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भाग घेतला होता. या मालिकेत रोहितने एकही शतक झळकावले नाही. तर ऑस्ट्रेलियातही रोहितने आतापर्यंत खेळलेल्या 2 डावांमध्ये मोठी धावसंख्या उभारलेली नाही. त्याच्या शेवटच्या 8 कसोटी डावांबद्दल बोलायचे झाले तर, रोहितने 2,52,0,8,18,11,3 आणि 6 धावा केल्या आहेत. गाब्बामध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यात रोहित शर्माकडून खूप अपेक्षा आहेत.





