Ind vs Aus 3rd ODI : पर्थमधील स्मृती मंधानाचे विक्रम ठरले शतक व्यर्थ, आस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा 3-0 नं सुपडा साफ…

Ind vs Aus 3rd ODI : भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ऐतिहासिक शतक झळकावले. मंधानाने 109 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 105 धावा केल्या. मात्र, मंधानाच्या या शतकानंतरही टीम इंडियाला मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतीय संघाचा पूर्णपणे सुपडा झाला आहे. अष्टपैलू खेळाडू ॲनाबेल सदरलँड हीने सामन्यासह मालिकावीराचा देखील किताब पटकावला.
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 6 गडी गमावताना 298 धावा केल्या. यादरम्यान ॲनाबेल सदरलँडने 95 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने संघासाठी 110 धावा केल्या. याशिवाय कर्णधार ताहलिया मॅकग्राने 50 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 56 धावा केल्या. याव्यतिरिक्त ॲशले गार्डनरने 64 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. या काळात अरुंधती रेड्डीने भारताकडून सर्वाधिक 4 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी….
विजयासाठी 299 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला 16 धावसंख्येवर पहिला धक्का बसला, जेव्हा रिचा घोष केवळ 02 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर स्मृती मानधना आणि हरलीन देओल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 118 (139 चेंडू) धावांची भागीदारी केली. या भागीदारीनंतर टीम इंडियाने विजयाकडे वाटचाल केल्याचे दिसत होते, परंतु तसे झाले नाही आणि 28व्या षटकात हरलीन देओलच्या रूपाने संघाला तिसरा धक्का बसला. हरलीनने 4 चौकारांच्या मदतीने 39 (64 चेंडू) धावा काढून माघारी परतली.
यानंतर टीम इंडियाने सातत्याने विकेट गमावण्यास सुरुवात केली आणि 200 धावसंख्येचा टप्पा ओलांडताना एकूण 7 विकेट पडल्या. टीम इंडियाला 201 धावांवर 7 वा आणि 8 वा धक्का बसला. यानंतर संघाने 203 धावांवर नववी विकेट गमावली. अखेर 215 धावांवर संघाला 10 वा आणि शेवटचा धक्का बसला.
Australia win the third and final ODI of the series.
Scorecard ▶️ https://t.co/pdEbkwGszg#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/r1Z3qqQCxR
— BCCI Women (@BCCIWomen) December 11, 2024
ऑस्ट्रेलियानं केली अप्रतिम गोलंदाजी…
यादरम्यान ॲशले गार्डनरने सर्वाधिक विकेट महत्वपूर्ण असे विजयी योगदान दिले. तिने 10 षटकात 30 धावा देत सर्वाधिक 5 बळी घेतले. याशिवाय मेगन शुट आणि अलाना किंगने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. ॲनाबेल सदरलँडला उर्वरित 1 विकेट मिळाली.





