IND vs AUS 2nd Test (Adelaide) :- ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीने शानदार शतक झळकावले होते. त्याने 143 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 100 धावांची खेळी खेळली. आता ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिंक बॉल डे-नाईट कसोटीत कोहलीने 102 धावा केल्या तर तो एक ‘विश्वविक्रम’ निर्माण करेल आणि वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडेल.
सध्या ॲडलेड ओव्हलवर सर्वाधिक कसोटी धावा करणारा कोहली तिसरा फलंदाज आहे. कोहलीने आतापर्यंत 509 धावा केल्या आहेत. या यादीत दुसरा क्रमांक वेस्ट इंडिजचा महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्सचा आहे. या मैदानावर सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 552 धावा केल्या आहेत. त्यानंतर ब्रायन लारा पहिल्या क्रमांकावर आहे. लाराने 611 धावा केल्या आहेत.
आता कोहलीला लाराचा विक्रम मोडण्यासाठी आणि ॲडलेडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 102 धावांची गरज आहे. विवियन रिचर्ड्सचा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला फक्त 44 धावांची गरज आहे. आता कोहली ॲडलेडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
ॲडलेडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा
ब्रायन लारा – 610 धावा
सर व्हिव्हियन रिचर्ड्स – 552 धावा
विराट कोहली – 509 धावा
वॅली हॅमंड – 482 धावा
लिओनार्ड हटन – 456 धावा.
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द…
विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 119 कसोटी खेळल्या आहेत. या सामन्यांच्या 203 डावांमध्ये त्याने 48.13 च्या सरासरीने 9145 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 30 शतके आणि 31 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 254* धावा आहे. कोहलीने जून 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टनमध्ये कसोटी पदार्पण केले होते.