IND vs AUS 2nd Test : टीम इंडिया ॲडलेडला रवाना, गुलाबी चेंडूने खेळला जाईल दिवस-रात्र सामना…

IND vs AUS 2nd(Adelaide, Pink Ball) Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. या मालिकेतील पहिली कसोटी पर्थ येथे खेळली गेली. आता दुसऱ्या कसोटीसाठी, दोन्ही संघ ॲडलेडच्या ओव्हलवर आमने-सामने असतील, जिथे दिवस-रात्र कसोटी गुलाबी चेंडूने खेळली जाईल. पिंक बॉल टेस्टसाठी टीम इंडिया ॲडलेडला रवाना झाली आहे.
टीम इंडिया ॲडलेडला रवाना झाल्याची माहिती रेव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. भारतीय संघ कॅनबेराहून ॲडलेडला रवाना झाला आहे.
🎥 WATCH: Team India arrives in Adelaide ahead of the Pink Ball Test vs Australia! 🏏 Fans give a warm welcome at their hotel. 💙🔥#Raysportzcricket #TeamIndia #INDvsAUS #AUSvsIND #BGT #RohitSharma𓃵 #RohitSharma #ShubmanGill @Sourav_Journo @AnkanKar @im_sandipan pic.twitter.com/HT1hG3mlSg
— Ray Sportz Cricket (@raysportz_cric) December 2, 2024
06 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिंक बॉल कसोटीपूर्वी टीम इंडियाने कॅनबेरा येथे पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूचा सराव सामना खेळला. मात्र, सराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने 46-46 षटकांचा सराव सामना खेळला आणि 6 गडी राखून विजय मिळवला.
रोहित शर्माचे पुनरागमन…
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा ॲडलेड पिंक बॉल कसोटीपूर्वी परतला आहे. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय कर्णधार उपलब्ध नव्हता. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे तो ऑस्ट्रेलियात येऊ शकला नाही. पर्थ कसोटीत उपकर्णधार जसप्रीत बुमराहने टीम इंडियाची कमान सांभाळली. आता रोहित शर्माचे पुनरागमन झाले असून कॅनबेरा येथे खेळल्या गेलेल्या गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यातही तो सहभागी झाला होता.
मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर…
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत टीम इंडियाने 295 धावांनी शानदार विजय नोंदवला होता. अशाप्रकारे पहिली कसोटी जिंकून भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता ॲडलेडमध्ये विजय मिळवून टीम इंडियाला ही आघाडी 2-0 ने करायची आहे. आता ॲडलेड कसोटीत टीम इंडिया कशी कामगिरी करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





