IND A vs SA A : ‘ऑफ साईडला जास्त फिल्डर नाहीयेत, तू …’, पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळाली ‘ऋषभ पंती’, VIDEO व्हायरल

Rishabh Pant stump mic commentary : इंग्लंड दौऱ्यादरम्यान झालेल्या दुखापतीनंतर भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत पूर्णपणे फिट होऊन मैदानावर परतला आहे. सध्या तो भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघांमधील चार दिवसीय सामन्यात भारत अ चे कर्णधारपद सांभाळत आहे. या सामन्यात पंतने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका अ संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार आफ्रिका संघाने पहिल्या दिवसअखेर ९ बाद २९९ धावा केल्या. दरम्यान या सामन्याती ऋषभ पंतचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
सामन्यादरम्यान ऋषभ पंत विकेटमागून सातत्याने बोलताना दिसला, ज्याचा व्हिडीओ स्टंप माईकद्वारे रेकॉर्ड होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेहमीच्या विनोदी शैलीनुसार, पंतने फिरकी गोलंदाज तनुष कोटियन आणि मानव सुतार यांना सातत्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी अनोख्या पद्धतीने प्रोत्साहन दिले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ऋषभ पंतचा व्हिडीओ व्हायरल –
Rishabh Pant is back – and so are the stump mic moments! 🎯#INDAvSAA, 1st Unofficial Test, LIVE NOW 👉 https://t.co/JjpHHM4t7l pic.twitter.com/8fPyEcNayq
— Star Sports (@StarSportsIndia) October 30, 2025
तनुष कोटियनला पंत म्हणाला, “ऑफ साईडला जास्त फिल्डर नाहीयेत, तू त्याच लाईन लेंग्थवर गोलंदाजी करत राहा. थोडा वेळ सातत्याने स्टंपवर मारा करत राहा, खेळू दे त्याला. हाहा वैतागून जाऊ नकोस, तू गोलंदाजी करत राहा. शाब्बास, लय मिळवण्याचा प्रयत्न करा, १-२ ओव्हरमध्ये विकेट मिळेल. वैतागून जाऊ नका.” पंतने हे उद्गार सातत्याने तनुषला संबोधित करताना काढले.
हेही वाचा – IND W AUS W : स्मृतीने विचित्र पद्धतीने गमावली विकेट! थर्ड अंपायरच्या निर्णयाने झाली चकित, पाहा VIDEO
दुसरीकडे, मानव सुतार गोलंदाजी करताना पंतने म्हटले, “अरे भाई हीच लेंग्थ, आता असेच सहा बॉल टाकून दाखव.” हे बोलताना पंत स्लिपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डरकडे पाहून हसत होता. पंतच्या या विनोदी आणि प्रेरणादायी शैलीमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे.
हेही वाचा – IND A vs SA A : भारतीय फिरकीपटूंची पहिल्याच दिवशी कमाल! दक्षिण आफ्रिकेने गमावल्या ९ विकेट्स
इंग्लंड दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्यानंतर पंत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) सराव करत होता. आता तो पूर्ण फिट झाला असून, दक्षिण आफ्रिका अ विरुद्ध चांगली कामगिरी केल्यास दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत त्याला संधी मिळू शकते. आतापर्यंत पंतने भारतीय संघासाठी ४७ कसोटी सामन्यांत ३४२७ धावा केल्या आहेत.





