IND A vs SA A : ऋषभ पंतचे दमदार कमबॅक अन् कोटियनचा ऑलराऊंड डंका! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ३ विकेट्सनी विजय

IND A vs SA A India A Beat South Africa A by 3 Wickets : कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाने अनधिकृत कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान म्हणून दक्षिण आफ्रिका अ संघाचा तीन गडी राखून पराभव केला. या सामन्यात अखेरच्या दिवशी २७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत अ संघाने ७ गडी गमावून विजय मिळवला आणि दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतने ११३ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांसह ९० धावांची खणखणीत खेळी साकारली. अवघ्या १० धावांनी शतक हुकले, तरी त्याच्या या खेळीने विजयाची मजबूत पायाभरणी केली. अष्टपैलू तनुष कोटियन आणि अंशुल कंबोज यांनी बॅट आणि बॉल दोन्हीने चमक दाखवली. कोटियनने सामन्यात एकूण ८ विकेट्स घेतल्या (पहिला डाव: १३ धावा, दुसरा डाव: २३ धावा) आणि त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. कंबोजने दोन्ही डावांत मिळून ४ विकेट्स घेतल्या.
ऋषभ पंत शानदार 90 रन बनाकर आउट हुए 🔥
शतक के बहुत करीब, लेकिन क्या शानदार पारी थी 👏
📸: JioHotstar I #INDAvsSAA pic.twitter.com/cs7zTS9gvz
— CricTracker Hindi (@ct_hindi) November 2, 2025
अखेरच्या दिवशी लक्ष्याचा नाट्यमय पाठलाग –
सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारत अ संघाने २१५ धावांवर ७ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर अंशुल कंबोज (४६ चेंडूत ४ चौकार, २ षटकारांसह नाबाद ३७) आणि मानव सुथार (५६ चेंडूत ३ चौकारांसह नाबाद २०) यांनी आठव्या विकेट्ससाठी नाबाद ६२ धावांची भागीदारी रचली आणि संघाला विजयापर्यंत पोहोचवले. तनुष कोटियनने ३० चेंडूत २ चौकारांसह २३ धावा जोडल्या. आयुष बदोनीने पण ३४ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून तियान व्हॅन वुरेनने ३ तर त्शेपो मोरेकीने २ विकेट्स घेतल्या.
डावांची थोडक्यात माहिती:
- दक्षिण आफ्रिका अ पहिला डाव: ३०९ धावा
- भारत अ पहिला डाव: २३४ धावा
- दक्षिण आफ्रिका अ दुसरा डाव: १९९ धावा (सर्वबाद)
- भारत अ दुसरा डाव: २७५/७ (विजय)
हेही वाचा – Karun Nair Century: करुण नायरचं दमदार कमबॅक! बॅक टू बॅक ठोकली शतकं, पुन्हा टीम इंडियात परतणार?
तनुष कोटियनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारत अ संघाचा विजय सोपा झाला. आता चाहत्यांना मालिकेतील दुसऱ्या सामन्याची उत्सुकता लागली आहे.





