पुणे जिल्हा | यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोर्यांचे वाढते प्रमाण

राहु, (वार्ताहर) – दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात म्हणजेच यवत पोलीस स्टेशन हद्दीतील विविध ठिकाणी घरफोडी, चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांनमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी परिसरात धुमाकूळ घातला आहे.
एका मागे वारंवार अशा अनेक घरफोड्या चोर्या चोरट्यांनी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले आहे; परंतु यवत पोलिसांकडून पाहिजे तसे सहकार्य होत नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे. सुदैवाने अजून तरी नागरिकांच्या जीवाशी बेतेल अशी कोणतीही दुर्घटना घडली नाही; मात्र मागील घडलेल्या घरफोड्या चोर्यांची परिस्थिती पाहता हे नाकरता ही येणार नाही. पश्चिम भागातील दहीटणे, देवकर वाडी, देवकर मळा, मगरवाडी, गणेश नगर, मगरवाडी, पाटेठाण, इत्यादी गावांमध्ये वारंवार मोठ्या चोर्यांच्या घटना वाढताना दिसत आहे.
गस्तीची गरज
दौंड च्या पाच्छिम भागातील यावत पोलीस स्टेशन च्या हद्दीत अनेक गावे येत आहेत. वरील गावाबरोबर टोकाच्या भागातील गावात म्हणजेच टाकळी, पाणवली, वडगाव बांडे, या गावामध्ये देखील गस्तीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यामुळे यावात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गस्त वाढविणे गरजेचे आहे.





