Pune District : सासवड नगरपरिषदेत महिला प्रतिनिधींची वाढ

सासवड : सासवड नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी आरक्षणाचे अंतिम जागा वाटप जाहीर करण्यात आले. उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे या निवडणुकीच्या निर्णय अधिकारी असून, सासवड नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी कैलास चव्हाण यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
सासवड शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून इच्छुक उमेदवारांचे गट तयार होऊ लागले असून, आरक्षणाच्या बदलामुळे काही प्रभागांमध्ये नवीन चेहरे निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी ही आरक्षण घोषणा पारदर्शक व शांततेत पार पडली.
जागावाटपानुसार सासवड नगरपरिषद क्षेत्रात एकूण ११ प्रभागांमध्ये २२ जागा असून त्यापैकी काही जागा सर्वसाधारण, काही ओबीसी (महिला) तर काही अनुसूचित जाती (महिला) आणि अनुसूचित जाती (सर्वसाधारण) श्रेणींमध्ये राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
प्रभाग क्रमांक जागा क्रमांक आरक्षण १ अ ओबीसी (महिला), १ ब सर्वसाधारण, २ अ ओबीसी (महिला), २ ब सर्वसाधारण, ३ अ एससी (महिला), ३ ब सर्वसाधारण, ४ अ एससी (सर्वसाधारण), ४ ब सर्वसाधारण (महिला), ५ अ सर्वसाधारण (महिला), ५ ब सर्वसाधारण, ६ अ सर्वसाधारण (महिला), ६ ब सर्वसाधारण, ७ अ सर्वसाधारण महिला, ७ ब सर्वसाधारण, ८ अ ओबीसी (सर्वसाधारण), ८ ब सर्वसाधारण (महिला), ९ अ ओबीसी (सर्वसाधारण), ९ ब सर्वसाधारण (महिला) १० अ ओबीसी (सर्वसाधारण), १० ब सर्वसाधारण (महिला), ११ अ ओबीसी (महिला), ११ ब सर्वसाधारण, या आरक्षणानुसार नगरपरिषदेतील महिला प्रतिनिधित्वात वाढ होणार आहे.
नागरिकांमध्ये उत्सूकता
एकूण २२ पैकी जवळपास १० जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिलांना निवडणुकीत सक्रिय संधी मिळणार आहे. स्थानिक नागरिकांमध्येही नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, पुढील काही दिवसांत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.





