पिंपरी : दोन दिवसांपासून शहरातील तापमानात पुन्हा वाढ

पिंपरी – गेल्या आठवड्यात तापमानात घट होत असताना दोन दिवसांपासून शहरातील तापमान पुन्हा वाढले आहे. गेल्या आठवड्या 37 ते 38 अंश सेल्सियस असणारे तापमानाने आज 40 अंश सेल्सियसचा आकडा ओलंडला. त्यामुळे दिवसभर कडक उन्हाचे चटके तर रात्री प्रचंड उकाडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एप्रिल महिन्याच्या मध्यापासून पिंपरी-चिंचवडचे तापमान 42 अंश सेल्सियसकडे झेपावले होते. कडक उन्हामुळे रस्ते ओस पडले होते. ऐन कडक उन्हात लोकसभेचे मतदानही पार पडले. यानंतर मात्र ढगाळ वातावरण आणि हलक्‍या सरींमुळे तापमान काही अंशी घसरले होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 37 ते 38 अंश सेल्सियसवर स्थिरावलेल्या तापमानामुळे शहरवासियांना काही अंशी दिलासा मिळाला होता.

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तापमानाने वाढ नोंदविण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी 40 अंश सेल्सियसची नोंद करणाऱ्या तापमानाने आज 41 अंशाकडे झेप घेतली. दोन दिवसांपासून पडणाऱ्या कडक उन्हामुळे घरामध्ये राहणेच नागरिक पसंद करू लागले आहेत. दिवसभराच्या कडक उन्हानंतर सायंकाळ आणि रात्रीच्या प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. तापमानापासून स्वत:चे संरक्षण करावे, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे अवाहन, प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×