Pune : झेंडूच्या भावात वाढ
Updated On:

पुणे : मार्गशीर्ष महिना सुरू असून, बाजारात सुट्ट्या फुलांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने रविवारी (दि. २२) गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारात झेंडूची आवक कमी प्रमाणात झाली. बाजारात होत असलेल्या मागणीच्या तुलनेत माल कमी पडल्याने झेंडूच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली.
लग्नसराई सुरू असल्याने लग्नमंडपासह विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी होणार्या सजावटीसाठी डच गुलाब, कार्नेशियन, जर्बेरा, लिलियम, ऑर्चिड, तसेच केशरचनेसाठी जिप्सोफिला, कागडा आदी फुलांना मागणी कायम आहे. बाजारात बहुतांश फुलांची आवक जावक कायम असल्याने गत आठवड्याच्या तुलनेत भाव टिकून असल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.





