वीजेच्या दरात वाढ! सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या नवे दर

Mahavitran Electricity Price| देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. एकीकडे राजकीय पक्षाकडून विविध आश्वासने दिली जात आहेत. अशातच आता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) नवीन वीज दर लागू केले आहेत. वीजदरवाढ करत महावितरणने सर्वसामान्य जनतेला मोठा धक्का दिला आहे.
वीज बिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे, तर स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढ करण्यात आली आहे.हे नवे दर 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. MERCने जारी केलेल्या नव्या टेरिफ प्लॅन अंतर्गत पूर्वी नागरिकांना 0 ते 100 युनिटसाठी 5.58 रुपये प्रति युनिट दरानं बिल भरावं लागत होतं, आता त्यांना प्रति युनिट 30 पैसे जास्त म्हणजे 5.88 रुपये मोजावे लागणार आहेत. Mahavitran Electricity Price|
🕡 6.36pm | 1-4-2024 📍Nagpur | संध्या. ६.३६ वा. | १-४-२०२४ 📍 नागपूर.
LIVE | Media interaction.#Nagpur #Maharashtra https://t.co/XToUL0w61V
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 1, 2024
नव्या दरवाढीनुसार, 101 ते 300 युनिटसाठी 11 रुपये 46 पैसे मोजावे लागतील. तर, 301 ते 500 युनिटसाठी 15 रुपये 72 पैसे आणि 500 च्या वर युनिटसाठी 17 रुपये 81 पैसे मोजावे लागतील. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? Mahavitran Electricity Price|
वाढलेल्या विजेच्या दरांबाबत महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या वाढीमुळे कमी उत्पन्न गटातील लोकांवर परिणाम होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
हेही वाचा:
‘स्टुडंट ऑफ द इअर 3’बाबत करण जोहरकडून मोठी माहिती समोर; चित्रपट नाही तर…





