Salman Khan : भाईजानच्या सुरक्षेत वाढ ; गॅलेक्सी अपार्टमेन्टमधील राहत्या घराला ‘सुरक्षा कवच’, आता काचा झाल्या बुलेटप्रुफ

मुंबईः अभिनेता सलमान खानने त्याच्या निवास्थानाची सुरक्षा वाढवल्याचे दिसत आहे. सलमानने त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये नवीन बुलेटप्रुफ काच बसली आहे. तसेच हाय रिझॅाव्होशन असणारे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले आहेत. काळवीट शिकार प्रकरणावरून लॅारेन्स बिश्नाई टोळीकडून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अॅाक्टोबर २०२४ मध्ये बाबा सिद्दकी यांची हत्या झाल्याच्या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
14 एप्रिला सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंच्या इथे फायरिंग झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात बिश्नाई टोळीचा संबंध असल्याचे समोर आले होते. गेल्या काही वर्षांपासून सलमान खानला बिश्नाई टोळी टार्गेट करताना दिसत आहे. सलमानला आणि त्याच्या घरातील सदस्यांना धमकीचे फोन येत आहेत. यामुळे सलमानने त्याच्या अपार्टमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बुलेटप्रुफ काच, सीसीटीव्ही कॅमेरे आदी गोष्टी बसवलेल्या आहेत. बिग बॉस 18 च्या शोच्या शूटला सलमान खानच्या सुरक्षेसाठी 60 पेक्षा जास्त सिक्युरिट गार्ड आहेत. त्याच्या बहुचर्चित सिकंदर या चित्रपटाच्या सेटवरही सलमानला Y+ सुरक्षा पुरवण्यात येत आहे.
प्रकरण काय होतं ?
1998 साली हम साथ साथ है सिनेमाच्या शूटिंग दरम्यान काळवीट प्रकरण घडले होते. ज्यात सलमान खानने बिश्नाई समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या काळवीटाची शिकार केली होती, असा आरोप त्याच्यावर आहे. तेव्हापासून सलमान बिश्नाई टोळीच्या रडारवर आला आहे. सध्या गँगस्टर लॅारेन्स बिश्नाई तुरुंगात असून त्याच्या साथदारांकडून गेल्या काही दिवसांपूर्वी हल्ला केल्याचे सांगण्यात येत होते.





