मुंबईत बांगलादेशी अन् रोहिंग्यांच्या लोकसंख्येमध्ये वाढ

मुंबई – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अभ्यास अहवालात मोठे खुलासे करण्यात आले आहेत. मुंबईतील हिंदू लोकसंख्या 2051 सालापर्यंत 54 टक्के कमी होईल. शिवाय बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढेल, असे अहवालातून चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या अहवालाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
किरीट सोमय्या यांनी म्हटलंय की, 2051 पर्यंत, गोवंडी, मानखुर्द, धारावी आणि कुर्ला या झोपडपट्ट्यांमध्ये रोहिंग्यांची संख्या वाढेल. तर हिंदूची लोकसख्या ही 54 टक्केपर्यंत येईल. किरीट सोमय्या म्हणाले की, 1961 पासून आतापर्यंत हिंदूंची लोकसंख्या 88 टक्क्यांवरून 2011 मध्ये 66 टक्के झाली आहे.
तर, मुस्लिम लोकसंख्या 1961 मधील आठ टक्क्यांवरून 2011 मध्ये 21 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.याशिवाय असा अंदाज आहे की, 2051 पर्यंत हिंदू लोकसंख्या 54 टक्के इतकी कमी होईल आणि मुस्लिम लोकसंख्या सुमारे 30 टक्के वाढेल. मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्या समुदायांच्या वाढत्या संख्येचा शहराच्या सामाजिक- अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. कागदपत्र नसलेले बेकायदेशीर स्थलांतरित कसे बनावट मतदार ओळखपत्र मिळवत आहेत हे देखील या अहवालात उघड झाले आहे.
किरीट सोमय्यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटलंय की, मी धार्मिक भावना भडकावण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मराठी मुस्लिम सेवा संघ आणि अशा 400 स्वयंसेवी संस्था मुस्लिमांना व्होट जिहादसाठी भडकवत आहेत. धार्मिक भावनांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परिणामी दंगली होऊ शकतात.





