पिंपरी-चिंचवड परिसरात फसवणुकीच्या घटना

पिंपरी (प्रतिनिधी) – लग्न ठरवताना मुलगा सरकारी नोकरीला असल्याचे सांगून फसवणूक केली. तसेच, लग्नानंतर विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार कर्नाटक, मुंबई आणि चिखली येथे घडला.
याप्रकरणी 27 वर्षे विवाहित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती कुंडलिक जाधव, सासरा माधवराव जाधव, सासू, दिर परमेश्वर जाधव, नंदावा सुभाष दिनकर साठे (सर्व रा. बिदर, कर्नाटक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक
पिंपरी (प्रतिनिधी) – फ्लॅटचा रितसर व्यवहार करून 12 लाख रुपये घेतले. त्यांनतर तोच फ्लॅट अन्य व्यक्तीस विकून फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरीतील खराळवाडी येथे उघडकीस आला.
अफजल दाऊद कुरेशी (वय 36, रा. वैशालीनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद रफीक अब्दुलगणी दफेदार (वय 57), अल्ताफ अहमद मेहबूब मन्नूर (वय 58, दोघे रा. घोरपडीगाव, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी यांनी खराळवाडी पिंपरी येथील नवाजीश पार्क या बांधकाम साइटवरील दुसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅट फिर्यादी यांना 20 लाख 20 हजार रुपयांना विकण्याचे ठरवले. त्यासाठी फिर्यादीकडून 12 लाख रुपये घेतले. परंतु फ्लॅट वसीम पाचूलाल पठाण व त्यांची पत्नी शबनम वसीम पठाण विकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.





