अमित घुले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

मांजरी – मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व सदस्य अमित आबा ज्ञानेश्वर घुले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व वैकुंठ रथाचे लोकार्पण गुरुवारी ( दि.१६) संध्याकाळी साडेसहा वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मांजरी बुद्रुक- मुंढवा रोडवरील कुमार बायोप्लांट समोर माऊली नगर मध्ये नागरिकांच्या सेवेसाठी घुले यांच्या जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन होत आहे. तसेच यावेळी वैकुंठ रथाचा लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे. भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर , शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच शहर व मतदार संघातील सर्व भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गेली पंधरा वर्षे समाजकारण आणि राजकारण या माध्यमातून जनतेची सेवा करण्यात येत आहे. याठिकाणी जनसंपर्क कार्यालय यापूर्वीही सुरू ठेवून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम सुरू आहेच, मात्र, आता अधिक अद्ययावत सुविधा असलेले जनसंपर्क कार्यालय नव्याने सुरू होत आहे. याशिवाय वैकुंठ रथाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. अशी माहिती अमित आबा घुले यांनी दिली. नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तुषार तात्या घुले यांनी केले आहे.





