पुणे | भाविसा फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे सुनील आंबेकरांच्या हस्ते उद्घाटन
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भारतीय विचार साधना प्रकाशन संस्थेच्या bhartiyvichar.in या संकेतस्थळाचे उद्घाटन गुरूवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रीय विचारांची संस्कारक्षम पुस्तके ऑनलाइन विक्रीसाठी येथे उपलब्ध करण्यात आली आहेत. यावेळी संघ विचारांनी प्रेरित राष्ट्रीय साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध झाले.
हे साहित्य समाजात सर्व स्तरात जाण्यासाठी आगामी काळात यावर ऑडियो बुक, इ बुक ई.पर्याय उपलब्ध करून देऊन याचा सर्वांना उपयोग होईल असा विश्वास आंबेकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिपीन पाटसकर यांनी केले. भारतीय विचार साधना फाउंडेशनतर्फे साहित्य विक्रीची माहिती अरविंद रावेतकर यांनी] तर संकेतस्थळाची माहिती सोनम फराटे यांनी दिली.




