आधार कार्ड आणि सुकन्या समृध्दी योजना अभियानाचे आमदार शिरोळेंच्या हस्ते उद्घाटन
Updated On:

पुणे – नागरिकांसाठी आधार कार्ड दुरुस्ती व नवीन आधार कार्ड काढणे व सुकन्या समृध्दी योजना या अभियानाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते बुधवारी (दि. 1) झाले.
शिवाजीनगर भाजपाचे अध्यक्ष रविंद्र सळेगावकर यांचा हा उपक्रम आहे. 3 डिसेंबरपर्यंत साळेगावकर यांच्या मॉडेल कॉलनी येथील ऑफिसमध्ये ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे. या भागातील नागरिकांना या अभियानात सहभागी होऊन या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन साळेगावकर यांनी केले आहे.
यावेळी दत्ता खाडे, प्रतुल जागडे, गणेश बगाडे, आनंद छाजेड, मा. सुनील पांडे, ओंकारजी केदारी तसेच भाजप कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





