मुंबई – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे मराठमोळी अभिनेत्री वीणा जगताप मराठी रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून वीणा जगतापकडे पाहिले जाते. वीणा सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर शेअर केले फोटो व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षांवर होत असतो.
View this post on Instagram
अशात वीणाने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. वीणाने ख्रिश्चन पद्धतीचा गाऊन परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. या ख्रिश्चन पद्धतीचा गाऊनला शोभेल असा साजेसा मेकअप आणि हेअरस्टाईलही तिने केली आहे. या लूकमध्ये वीणा फारच गोड दिसत आहे. या लूकला तिने हटके कॅप्शन दिले आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनची चांगलीच चर्चा होत आहे.
तुम्ही तुमच्या हृदयात ज्या गोष्टी लपवता, त्या तुमच्या नजरेत दिसतात, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. त्याबरोबर तिने हार्ट इमोजीही शेअर केला आहे. आता या कॅप्शनवरून चाहते वीणा नेमकं काय म्हणते आहे याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करत आहे, या फोटोवर एका नेटकऱ्याने कमेंट करत तिला ‘प्रिन्सेस’ असं म्हटलं आहे. तर काहींनी तिच्या पोस्टवर ‘बार्बी डॉल’, ‘डॉल’ अशी कमेंट केली आहे.