– डॉ. रिता शेटीया Editorial : आनंदी देशांच्या यादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताने 118 व्या स्थानावरून (Editorial) किंचित सुधारणा करून 116 वे स्थान मिळवले असले, तरी भारत 100 च्या आत स्थान का मिळवू शकला नाही, त्या कारणांचा घेतलेला आढावा. संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित आणि चिरंतर विकासाच्या विषयावर काम करणार्या संस्थेने (जागतिक आनंद अहवाल 2026) दरवर्षीप्रमाणे ‘आनंदी देश निर्देशांक’ अहवाल जाहीर केला आहे. त्यामध्ये जगातील विविध देशांमधील आनंदाचे प्रमाण कसे आहे आणि कोणता देश कोणत्या क्रमांकावर आहे, याची यादी जाहीर केली आहे. यामध्ये फिनलंड सलग 9 व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. हा अहवाल गॅलप (ॠरश्रर्श्रीि), संयुक्त राष्ट्र (णछ) आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वेलबीइंग रिसर्च सेंटरद्वारे जारी केला जातो. जागतिक आनंद अहवाल 2026 सादर करताना चार महत्त्वाच्या निकषांचा/घटकांचा विचार केला जातो ते म्हणजे जीवन मूल्यांकन, दरडोई जीडीपी, सामाजिक आधार, आणि आरोग्यदायी आयुर्मान. तसेच स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचाराची धारणा या घटकांचा अभ्यास देखील केला जातो. Editorial जागतिक आनंद अहवालाची मुख्य वैशिष्ट्ये फिनलंड पहिल्या स्थानावर, आइसलँड (2), डेन्मार्क (3), कोस्टा रिका (4) आणि स्वीडन (5) हे अव्वल 5 आनंदी देश आहेत. फिनलंडमध्ये एक म्हण आहे, ‘बोलणे चांदी आहे, पण शांतता सोने आहे.’ एकांत आणि शांतता आवडणारा असा हा देश आहे. टॉप 10 मध्ये नॉर्वे, नेदरलँड्स, इस्रायल, लक्झेंबर्ग आणि स्वित्झर्लंडसारखे देश आहेत. समान समृद्धी, उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि मजबूत सरकारी सुरक्षा कवच, येथे श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी कमी आहे, ज्यामुळे मंदीसारख्या कठीण काळातही लोकांच्या चेहर्यावर हास्य टिकून राहते. भारताची स्थिती : भारत 116व्या क्रमांकावर असून, नेपाळ (99), पाकिस्तान (104) हे शेजारील देश भारताच्या वर आहेत, तर बांगलादेश (127), श्रीलंका (134) भारताच्या मागे आहेत. प्रमुख निष्कर्ष : कोस्टा रिकाने चौथ्या स्थानावर मोठी झेप घेतली आहे. सलग दुसर्या वर्षी पहिल्या 10 देशांत कोणतीही इंग्रजी भाषिक (अपसश्रेीहिशीश) देशाचा समावेश नाही. भारतात आनंद कमी होण्याची प्रमुख कारणे : स्वातंत्र्याचा विरोधाभास : अहवालानुसार, ‘स्वातंत्र्य घटका’च्या बाबतीत भारताची कामगिरी कमकुवत आहे. हा घटक हे मोजतो की, व्यक्तींना आपल्या आयुष्यात खरोखरच काही पर्याय उपलब्ध आहेत असे वाटते का आणि त्या पर्यायांमुळे त्यांना समाधान मिळते का? लोकशाही ही मुळात स्वातंत्र्यावरच बहरली पाहिजे. तरीही, अनेक भारतीयांना आपण बंधनात आहोत असे वाटते, हे बंध नेहमीच कायद्यांचे नसतात, तर सामाजिक अपेक्षा, इतरांशी केली जाणारी तुलना आणि इतरांच्या ‘बरोबरीने राहण्याच्या’ सततच्या शर्यतीमुळे निर्माण झालेले असतात. यामुळे एक प्रश्न उभा राहतो, आपले आयुष्य आपण आपल्या पद्धतीने जगत असताना आपण खरोखरच मुक्त आहोत का? की आपण केवळ इतरांनी घालून दिलेल्या निकषांचा (लशपलहारीज्ञी) पाठलाग करत आहोत? डिजिटल एकाकीपणा : सर्वात चिंताजनक बाब ही आहे की, आनंदात घट 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांमध्ये सर्वाधिक दिसून आली आहे. जिथे जगाच्या इतर भागांमध्ये तरुण जीवनावर समाधानी आहेत, तिथे अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या श्रीमंत देशांमधील किशोरांच्या आनंदाचा आलेख वेगाने खाली घसरला आहे. संशोधक यासाठी स्मार्टफोन आणि सोशल मीडियाला जबाबदार मानतात. पण गोष्ट इतकी सरळ नाही. गॅलपमधील वर्ल्ड न्यूजच्या व्यवस्थापकीय संपादक ज्युली रे म्हणतात, खरी समस्या ‘सामाजिक सहवासाची’ कमतरता आहे. जेव्हा तरुणांना आपल्या लोकांशी जोडले गेल्याचे वाटत नाही, तेव्हा ते एकटेपणा दूर करण्यासाठी स्क्रीनचा आश्रय घेतात. दुर्दैवाने, सोशल मीडियावरील ही डिजिटल निर्भरता त्यांचा आनंद वाढवण्याऐवजी त्यांची उदासीनता आणखी वाढवते. सोशल मीडियावर वाढती तुलनात्मक भावना भारतीयांचे मानसिक समाधान कमी करत आहे. आर्थिक असुरक्षितता : युद्धाच्या परिस्थितीतही इस्रायलने पहिल्या 10 मध्ये स्थान प्राप्त केले आहे. तज्ज्ञांनुसार, इस्रायलमध्ये ‘सामाजिक एकजूट’ आणि ‘कौटुंबिक आधार’ खूप मजबूत आहे, जो संकटाच्या वेळी मानसिक बळ देतो. युद्धाच्या परिस्थितीतही युक्रेनमध्ये (105वे) ‘सामायिक उद्दिष्टाची’ भावना आणि रशियामध्ये (72वे) मध्यम स्थिरता कायम आहे, ज्यामुळे दोघांच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली नाही. पण भारताच्या बाबतीत युद्ध दुसर्या देशांचे चालू आहे तरी भारतीय काळजी करतात ज्यामुळे आनंदी न राहता सतत टेंशनमध्ये राहतात. ताज्या अहवालात भारताचे चित्र आशा आणि आव्हान, दोन्ही दर्शवते. 2024 (126) आणि 2025 (118) च्या तुलनेत स्थिती सातत्याने सुधारत आहे. भारताची हळू पण निश्चित वाढ होत आहे. तथापि, आपण शेजारील देश चीन (65), नेपाळ (99) आणि पाकिस्तान (104) यांच्या मागे आहोत. इप्सॉसच्या आनंद सर्वेक्षणात 29 देशांच्या यादीत भारत 22व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी 7 व्या स्थानावर होता. दोन्ही अहवालानुसार आनंद कमी होण्याची सर्वात मोठी कारणे ‘आर्थिक असुरक्षितता’ आणि ‘सोशल मीडियाचा दबाव’ आहे. सोशल मीडियावर वाढती तुलनात्मक भावना भारतीयांचे मानसिक समाधान कमी करत आहे. किशोरवयीन मुलींवर अधिक परिणाम : डिजिटल जगाचा सर्वात खोल आणि नकारात्मक परिणाम 15 वर्षांच्या मुलींवर दिसून येत आहे. ज्या मुली 5 तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात, त्या जीवनात सर्वात कमी समाधानी आहेत. ‘इन्फ्लुएंसर कल्चर’ आणि ‘परफेक्ट लाइफ’च्या रील्स पाहून त्यांच्यात स्वतःला कमी लेखण्याची भावना आणि तुलनात्मक ताण वाढत आहे. सोशल मीडियावर ‘कंटेंट पाहणे’ त्यांना मानसिकदृष्ट्या उदासीनता आणि एकाकीपणाकडे ढकलत आहे, ज्यामुळे त्यांचे खरे हसू फिके पडत आहे. आपल्या माणसांच्या सोबतीची कमतरता मानसिक शांती आणखी कमी करत आहे, भविष्यातील अनिश्चितता हेदेखील मोठे कारण आहे. आनंदी देशांचे आधारस्तंभ संशोधनातून असे दिसून येते की, सरकारवरील विश्वास, पारदर्शकता, सामाजिक सलोखा, निसर्गाशी जवळीक आणि मोकळेपणा हे आनंदाचे मुख्य आधारस्तंभ आहेत.