कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात “who is dhangekar?” म्हणणारे चंद्रकांत पाटील निकालानंतर म्हणाले,”…

पुणे : राज्याचे राजकारण मागील एक महिन्यापासून पोटनिवडणुकाच्या भोवती फिरताना दिसले. दरम्यान, यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना ‘हू इज धंगेकर’ म्हणत हिणवले होते. मात्र तब्बल ३ दशकानंतर भाजपचा कसब्याचा गड महाविकास आघाडीने हिसकावून घेतला. या विजयानंतर रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या हिणवण्याला तीन शब्दात उत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी रवींद्र धंगेकर यांना ‘हू इज धंगेकर’ म्हटल्यानंतर नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी ‘मी आहे धंगेकर’ असे प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ‘ठीक आहे: म्हणत त्यांनी बोलणे टाळले. कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागले होते. कसबा हा भाजपचा गड मानला जात होता. हा मतदारसंघ सलग २८ वर्षे भाजपकडे होता.
प्रचारादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीकडून लढत असलेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याबाबत बोलताना ‘हू इज धंगेकर’ असे विधान केले होते. याच धंगेकर यांनी भाजपचा २८ वर्षांचा गड उद्धवस्त केला. त्यानंतर मी आहे धंगेकर असे प्रत्युत्तर नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले होते. त्यावर आज पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना तुम्ही म्हणालात, ‘हू इज धंगेकर’, कसब्याचे आमदार म्हणाले की ‘मी आहे रवीद्र धंगेकर’ असे विचारले असता पालकमंत्री पाटील हो, ठीक ठीक चला असे म्हणत त्यांनी बोलणे टाळले.





