बीग बॅश गाजवलेल्या या खेळाडूंसाठी आयपीएल लिलावात चुरस

Updated On:-4 फोटो
Photo 1
1 / 4

आणखी संबंधित फोटो

पुणे – गेल्या काही वर्षांमध्ये, इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वच संघांनी बिग बॅश लीगमधील खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत बीबीएल मध्ये चांगली कामगिरी करणार्‍या खेळाडूंना मोठी रक्कम मोजत आपल्या संघात स्थान दिले आहे. यामुळे आयपीएल संघांना मोठा लाभ झाला आहे असेही नाही, परंतु हे खेळाडू मिळवण्यासाठी प्रत्येक लिलावात आयपीएल संघांत बीबीएल खेळलेल्या खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी स्पर्धा असते.
यंदाची बीग बॅश लीग स्पर्धा नुकतीच पार पडली. तर 2022 चा आयपीएल लीलाव 12-13 फ्रेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा बीग बॅशमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी आयपीएल संघांमध्ये चुरस पहायला मिळेल यात शंका नाही.
या लेखातून यंदाच्या बीग बॅशमध्ये दमदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, जे आयपीएल लिलावात मोठ रक्कम मिळण्याच्या क्षमतेचे आहेत.

1) बेन मॅकडरमॉट
उजव्या हाताने फलंदाजी करणार्‍या बेन मॅकडरमॉटने यंदाच्या बिग बॅश लीगमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तो ऑस्ट्रेलियन देशांतर्गत क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत आहे आणि पुढचे पाऊल आयपीएलमध्ये टाकण्यासाठी सज्ज आहे.
तो कोणत्याही संघासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकतो कारण तो मधल्या फळीत उत्कृष्ठ फलंदाजी करत संघाचा डाव सावरु शकतो. याशिवाय, गरज पडल्यास तो यष्टीरक्षणही करु शकतो.बिग बॅश लीगच्या यंदाच्या हंगामात मॅकडरमॉटने 12 डावांमध्ये 51.90 च्या सरासरीने आणि 153.49 च्या स्ट्राइक रेटने 571 धावा केल्या आहेत. यासह मॅकडरमॉटने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 44 सामन्यांत 33.15 च्या सरासरीने 2288 धावा केल्या आहेत. तरे लिस्ट ए क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करत 28 सामन्यांमध्ये 47 च्या सरासरीने 1239 धावा केल्या आहेत.

2) हेडन केर
न्यू साउथ वेल्सच्या या डावखुर्‍या वेगवान गोलंदाजासाठी यंदाचा बीबीएल हंगाम सिडनी सिक्सर्ससाठी चांगला गेला. त्याने या मोसमात 13 डावात 22 विकेट घेतल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये नियंत्रित गोलंदाजी केली आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज हा नेहमीच प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा असतो. यामुळेच आयपीएल लिलावात केरला याचा लाभ मिळू शकतो. गोलंदाजी व्यतिरिक्त, तो फलंदाजीतही समाधानकारक कामगिरी करण्याच्या क्षमतेचा आहे. खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना वेगवान धावा करण्यातही केर माहिर आहे.

3) अ‍ॅश्टन आगर
अ‍ॅश्टन आगर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फिरकी गोलंदाज बनला आहे. त्याला पॉवरप्ले षटकांमध्ये तसेच मधल्या षटकांमध्ये काम कुशल गोलंदाजी करण्याचा मार्ग सापडला आहे आणि तो एक परिपूर्ण बचावात्मक गोलंदाज आहे.
बीग बॅशच्या यंदाच्या मोसमात पर्थ स्कॉचर्ससाठी त्याने 13 सामन्यांत 7 च्या इकॉनॉमी रेटने 15 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनुकूल असतील त्यामुळे तो संघासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो.

आणखी संबंधित बातम्या

Elon Musk : भारताने एलॉन मस्क यांचा स्टारलिंक रोखल्याचा दावा फेटाळला

Elon Musk : भारताने एलॉन मस्क यांचा स्टारलिंक रोखल्याचा दावा फेटाळला

लक्षवेधी : अन्नअर्थव्यवस्थेचे बदलते परिमाण

लक्षवेधी : अन्नअर्थव्यवस्थेचे बदलते परिमाण

Mohan Bhagwat : "जगाच्या कल्याणासाठी भारताची परंपरा महत्त्वाची" - मोहन भागवत

Mohan Bhagwat : "जगाच्या कल्याणासाठी भारताची परंपरा महत्त्वाची" - मोहन भागवत

Rahul Gandhi: राहुल-प्रियांका गांधींविरुद्ध दिल्लीत FIR ; आकाशवाणी भवनात घुसखोरी केल्याचा आरोप

Rahul Gandhi: राहुल-प्रियांका गांधींविरुद्ध दिल्लीत FIR ; आकाशवाणी भवनात घुसखोरी केल्याचा आरोप