हौसिंग फेडरेशनच्या निवडणूकीत 11 उमेदवार विजयी

पिंपरी : पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनची निवडणूक रविवारी फेडरेशनच्या वाकड येथील कार्यालयात पार पडली. या निवडणुकीत 14 पैकी 11 जणांचा विजय झाला आहे. अरुण देशमुख, सचिन लोंढे, तेजस्विनी डोमसे-सवाई, सुदेश राजे, सुधीर देशमुख, दत्तात्रय देशमुख, करमचंद गर्ग, हेमचंद्र कुरील, शैलेंद्र बिरथाटे, आशिष माने आणि डॉ. वैशाली गोरडे अशी निवडून आलेल्या सदस्यांची नावे आहेत.
फेडरेशनच्या कार्यकारिणीसाठी 14 जण इच्छुक होते. त्यापैकी 11 जण निवडून आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात तीन हजार 600 हौसिंग सोसायटी आहेत. त्यापैकी 150 सोसाट्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला होता.
मात्र प्रत्यक्षात फक्त 58 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. येत्या शुक्रवारी निवडून आलेल्या सदस्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वानुमते किंवा गुप्त मतदानाने अध्यक्ष, सरचिटणीस आणि खजिनदाराची निवड करण्यात येणार आहे.





