Kiara Advani : मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बॅालीवूडचे स्वीट कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कियाराने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांना मुलगी झाली आहे. दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कियाराने १५ जुलै रोजी रिलायन्स रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिची आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या वृत्ताची अधिकृत घोषणा कियारा आणि सिद्धार्थने केलेली नाही. सिद्धार्थ कियाराने फेब्रुवारी महिन्यात एक पोस्ट करून लवकरच आई बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. कियाराने बेबी बंपसह ‘मेट गाला 2025’च्या रेड कार्पेटवर झळकली. या लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. २०२३ मध्ये कियारा अडणावी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे लग्न झाले. २०२१ मध्ये आलेल्या शेरशाह या चित्रपटातून त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली. दोघांचे एकत्रित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कियारा ‘वॅार २‘ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १४ अॅागस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत दिसणार असून, कियाराची देखील महत्वाची भूमिका असणार आहे. दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राही त्याच्या आगामी ‘परम सुंदरी’ चित्रपटातून दमदार कमबॅक करणार आहे. हेही वाचा : “….तर त्यांनी महायुतीसोबत यावं,” जयंत पाटलांना बड्या नेत्याची ऑफर