“….तर त्यांनी महायुतीसोबत यावं,” जयंत पाटलांना बड्या नेत्याची ऑफर

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. मात्र जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताच एका बड्या नेत्याकडून त्यांना महायुतीसाठी ऑफर देण्यात आली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर दिली आहे. “जयंत पाटील यांचे तिकडे मन लागत नसेल किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुती सोबत आले पाहिजे. जयंत पाटील हे संघर्षशील नेते आहेत. त्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांना विकास करायचा असेल तर सत्तेसोबत आलं पाहिजे. राष्ट्रवादी सोडणार असाल तर मी मध्यस्थी करून त्यांना महायुतीत आणायला तयार आहे”, असे रामदास आठवले म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा सुरू होती. जयंत पाटील हे गेल्या सात वर्षांपासून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. या आधीच्या एका कार्यक्रमात त्यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावे आणि नव्या लोकांना संधी द्यावी अशी जाहीर मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चाही सुरू झाली. त्यानंतर अखेर पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. Jayant Patil |
कोण आहेत शशिकांत शिंदे ?
शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांचा अत्यंत विश्वासू साथीदार म्हटले जाते. Jayant Patil |
शशिकांत शिंदे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदार संघात सक्रीय असून ते दोनदा आमदार झालेले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून भाजपच्या महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. Jayant Patil |
हेही वाचा :
आता इंडोनेशियावर ट्रम्पचा ‘टॅरिफ बॉम्ब’ फुटला ; आयातीवर लादला १९% कर





