दोन्ही हात नसतानाही ‘या’ मुलीने केले मतदान
Updated On:

भोपाळ – लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील ९ राज्यांतील ७२ मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये मध्यप्रदेशमधील ६ जागांचाही समावेश आहे. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवामध्ये जबलपूरमधील भवानी या दिव्यांग मुलीने दोन्ही हात नसतानाही आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. भवानीने पहिल्यांदाच मतदान केले असून दोन्ही हात नसल्यामुळे पायाच्या बोटावर शाई लावली आहे. यावेळी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनीही तिला मोठी मदत केली.
याप्रसंगी भवानी म्हणाली, एक-एक मत किमती आहे. देश निर्मितीमध्ये आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्वांनी मतदान केले पाहिजे, असे आवाहन तिने केले.





