#Video : शिरूरच्या करंदीत सरपंच, पदाधिकाऱ्यांकडून दारूभट्ट्या उध्दवस्त

Updated On:
#Video : शिरूरच्या करंदीत सरपंच, पदाधिकाऱ्यांकडून दारूभट्ट्या उध्दवस्त

शिक्रापूर(पुणे) :- करंदी (ता. शिरूर) सांसद आदर्श गावामध्ये असलेले गावठी दारुधंदे व गावठी दारूभट्ट्या महिला सरपंच सुभद्रा ढोकले, उपसरपंच बबलू ढोकले यांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उध्दवस्त करीत दारू विक्रेत्यांना दारुविक्री बंद करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच दारुभट्ट्या जेसीबीच्या साहाय्याने नेस्तनाबूत करुन टाकण्यात आल्या आहेत.

करंदी येथे काही ठिकाणी दारूविक्री तसेच दारु भट्टीच्या माध्यमातून दारु निर्मिती केली जात असल्याची तक्रार यापूर्वी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे करीत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी आपला मोर्चा दारुभट्टी तसेच दारु अड्ड्यांवर वळविला.

यावेळी सरपंच सुभद्रा ढोकले, उपसरपंच बबलू ढोकले, ग्रामपंचायत सदस्या शोभा दरेकर, सुनिता ढोकले, रेखा खेडकर, सोनाली ढोकले, पांडुरंग ढोकले, शिवाजी दरेकर, संदीप ढोकले, नितीन ढोकले, अंकुश पंचमुख, ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे, बाजार समितीचे माजी सभापती शंकर जांभळकर, गोरक्ष ढोकले, अशोक ढोकले, सचिन दरेकर, बापू दरेकर, सुनील ढोकले, प्रवीण झेंडे, विशाल खरपुडे, बंटी ढोकले, पिंपळे जगतापचे उपसरपंच सागर शितोळे, स्वप्नील शेळके यांसह आदी उपस्थित होते.

“गावामध्ये दारु धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येणार आहे. करंदी गावामध्ये कोठेही दारु निर्मिती तसेच दारुविक्री होत असल्यास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पोलिसांच्या मदतीने त्या व्यक्‍तींवर कठोर कारवाई करणार आहे.
-सुभद्रा ढोकले (सरपंच, करंदी)

यावेळी संतप्त ग्रामस्थांनी करंदी व पिंपळे जगताप या भागातील दारुभट्ट्या जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्थ करीत तेथे आढळून आलेले दारुचे कॅनदेखील नष्ट करुन टाकले.

दरम्यान, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे, पोलीस शिपाई प्रफुल्ल सुतार, निखील रावडे, हेमंत कुंजीर, विकास पाटील, विकास मोरे, रोहिदास पारखे आदींनी याठिकाणी धाव घेत दारु निर्मिती करणाऱ्या तसेच दारुविक्री करणाऱ्या फाल्गुन संभाजी भोसले (वय 40, नीतू प्रतिक राठोड वय 34 व एक महिला (तिघे रा. करंदी ता. शिरूर), संन्याशी बजरंग राजपूत (वय 45, रा. पिंपळे जगताप ता. शिरूर) या चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत. तपास पोलीस हवालदार आजिनाथ शिंदे करीत आहेत.

 

आणखी संबंधित बातम्या

Crime News : कारेगावात पाण्याच्या प्लॅन्टमध्ये कामगाराची गोळी झाडून हत्या; अज्ञात आरोपीचा शोध सुरू

2026-09-29 19:37:54

Crime News : कारेगावात पाण्याच्या प्लॅन्टमध्ये कामगाराची गोळी झाडून हत्या; अज्ञात आरोपीचा शोध सुरू

Shirur : नादविहंग लेझीम पथकाने लक्ष वेधले

2026-09-27 07:23:41

Shirur : नादविहंग लेझीम पथकाने लक्ष वेधले

Gunthewari : केडगावनंतर आता दौंडमध्ये गुंठेवारी, बेकायदा दस्तांचा धडाका

2026-09-21 13:38:19

Gunthewari : केडगावनंतर आता दौंडमध्ये गुंठेवारी, बेकायदा दस्तांचा धडाका

Pune District : शिरूर तालुक्यात कायद्याचा धाकच उरला नाही

2026-09-20 08:26:45

Pune District : शिरूर तालुक्यात कायद्याचा धाकच उरला नाही

Crime News : शिरूर शहरात भरदिवसा गोळीबार

2026-09-19 07:59:12

Crime News : शिरूर शहरात भरदिवसा गोळीबार