Nagar | शिरसगाव येथे शारदीय नवरात्र उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

नेवासा, (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील जागृत असलेल्या जगदंबा देवी मंदिर प्रांगणात शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगत महंत हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने विजयादशमीच्या दिवशी करण्यात आली.
संत संगतीत राहून परमार्थ करून मनुष्य जीवाला धन्य तर भगवंताच्या नामस्मरणाद्वारे या जीवाला अंतर्मुख बनवा, असे आवाहन हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी केले.
शिरसगाव येथील जगदंबादेवीच्या मंदिर प्रांगणात शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी हभप अशोक महाराज निरफळ, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक अँड.देसाई देशमुख, हभप राजेंद्र महाराज आसने, हभप सुभाष महाराज देशमुख ,हभप प्रल्हाद महाराज कांबळे,
रामकृष्ण महाराज नाबदे, सुदर्शन महाराज देशमुख, गायनाचार्य पंढरीनाथ महाराज सोनवणे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, मृदुंगाचार्य नवनाथ महाराज आगळे, दत्तात्रय महाराज इष्टके,
दत्ता महाराज नवथर ,एकनाथ महाराज क्षीरसागर, कृष्णा महाराज निकम,अशोक महाराज साळुंके, भाऊसाहेब महाराज पोपळघट यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते
हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्याहस्ते काल्याची दहीहंडी फोडून दहा दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.
यावेळी सोहळा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने दत्तात्रय पोटे यांनी उपस्थित संत- महंतांचे व भाविकांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.





