मनोबल वाढावे म्हणून ‘या’ कंपनीने वाढवले कर्मचाऱ्यांचे वेतन

नवी दिल्ली : कोरोनामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. यातच एशियन पेंट्सनं कोरोना संकटात देखील कंपनीतील कामगारांची कपात तसेच त्यांच्या वेतनात कपात करण्याऐवजी त्यांचे वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
एशियन पेंट्स याआधीच कंपनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कोविड-19 फंडामध्ये 35 कोटी रुपयांची मदत केली आहे. कोरोनाविरोधातील या लढाईच कंपनीकडून वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल. कंपनीने विक्रेत्यांना मदत करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. विक्री चॅनेलचा भाग असलेल्या ठेकेदारांच्या खात्यात कंपनीने 40 कोटी रुपये ट्रांसफर केले आहेत.
कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित शिंगले यांनी ,आम्हाला खऱ्या नेतृत्वाचे आदर्श उदाहरण द्यायचे आहे. एक संस्था म्हणून आम्ही आमच्या हितचिंतकांची काळजी घेत आहोत, हे आम्हाला सिद्ध करायचं आहे. मी आमच्या बोर्डाला देखील अशा निर्णयांबाबत कळवत असतो. बोर्ड सदस्यांनी देखील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या निर्णयाला सहमती दर्शवली असल्याचे म्हटले आहे.




