नेपाळमध्ये प्रचंड सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव
Updated On:

नवी दिल्ली – नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी संसदेत तिसऱ्यांदा बहुमत सिद्ध केले आहे. प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी सेंटर) ला २७५ सदस्यांच्या संसदेच्या प्रतिनिधीगृहामध्ये १५७ सदस्यांचा पाठिंबा मिळाला.
संसदेत मतदानाच्यावेळी एकूण २६८ उपस्थित सदस्यांपैकी ११० सदस्यांनी प्रचंड यांच्याविरोधात मतदान केले. तर एका सदस्याने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. प्रचंड यांना विजयासाठी १३८ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती. पण १५७ मते मिळाल्याने प्रचंड यांनी विश्वास दर्शक ठराव सहज जिंकला.
प्रचंड यांनी नेपाळ कॉंग्रेस बरोबरची आघाडी सोडून माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (युनिफाईड मार्क्सवादी-नेनिनवादी) गटाबरोबर आघाडी केल्यामुळे त्यांना संसदेत पुन्हा बहुमत सिद्ध करावे लागले.





