नारायणगाव उपबाजार समितीत धना,मेथीची आवक वाढली तर टोमॅटोची आवक घटली

नारायणगाव (वार्ताहर ) : नारायणगाव उप बाजार समिती धना आवक वाढली असून टोमॅटोची आवक कमी झाली आहे. बुधवारी संध्याकाळी बाजार भाव (दि.११) धना २०० ते २१००, (आवक दोन लाख ४१ हजार ३०० जुडा ) मेथी २०० ते २२०० (आवक १ लाख १९ हजार ४०० जुडा), शेपू ४०० ते १४०० (आवक ३१ हजार तीनशे जुडा) तर टोमॅटो बाजार भाव ६०० ते १२०० (आवक ८ हजार १५५ क्रेट) होती. पाऊस नसल्याने धना मेथी व शेपूची आवक वाढली असून उष्णता वाढल्यामुळे टोमॅटोची आवक घटली आहे.
नारायणगाव उप बाजारात शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळत असलेले बाजार भाव समाधानकारक असल्याचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रकाश ताजणे, संचालक मंडळ व सचिव रुपेश कवडे, उपसचिव शरद घोंगडे यांनी म्हटले आहे. यासंदभार्त आमच्या प्रतिनिधी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी खालील प्रतिक्रिया दिल्या.
मागील दोन दिवसापूर्वी मेथीला दोन हजार रुपये भाव मिळाला परंतु आज बाराशे ते पंधराशे रुपये भाव आहे. उत्पादनापासून शेतमाल विक्रीपर्यंत येणारा खर्च पाहता आताचा भाव परवडत नाही. बाजार समितीच्या कामाबद्दल समाधानी आहे. पाऊस नसल्याने धना मेथी शेपूची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
शैलेश आहेर शेतकरी.. आणे ता.जुन्नरउष्णतेचा फटका टोमॅटो उत्पादकांना बसला असून एकरी उत्पादनात घट झाली आहे. आपल्या परिसरातील टोमॅटो उत्पादन अंतिम टप्प्यात असल्याने आवक कमी होत आहे. हवामान बदलाचा टोमॅटो उत्पादनावर परिणाम झालेला दिसून येतो.
अविनाश भोर.. शेतकरी





