सातारा : कोयना विभागात राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड; विविध गावांतील पदाधिकारी व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

कोयनानगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या कोयना विभागातील अनेक गावांनी शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का दिला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नेतृत्व स्वीकारून कोयना विभागात भगवे वादळ निर्माण केले आहॆ.
कोयना विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाटणकर गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्याला भगदाड पडले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून कोयना विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत.
पालकमंत्री शंभूराज देसाई हाच विकासाचा प्रवाह असल्याने आपले गाव विकासाच्या प्रवाहात यावीत म्हणून गोष्टवाडी, आनंदवाडी, खांडेकरवाडी, शिंदेवाडी, सुतारवस्ती, राममळा, मोहितेवस्ती येथील रमेश जाधव तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ पाथरपुंज येथील सर्व ग्रामस्थ पळ्याचावाडा येथील ग्रामस्थ, वांझोळे (गोजेगाव) येथील राहुल कांबळे व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी शंभूराज देसाई यांनी सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी कोयना विभागातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते





