Kolhapur News: कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून ८ जण बुडाले, तर दोघे बेपत्ता

Kolhapur News : कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात आज मोठी दुर्घटना घडली आहे. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. अशात पुराच्या पाण्यातून जाताना बस्तवाड येथे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण बेपत्ता आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्कीवाट-बस्तवाड मार्गावर सात जण केळी आणण्यासाठी निघाले होते. याच मार्गावर अकिवाट गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी काहीजण आले होते.
दरम्यान केळी आणण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर पलटी झाला. यातील सात जण पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागले. यावेळी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
बुडालेल्या आठ जणांपैकी तिघेजण पोहत आले तर दोघांना वाचवण्यात आले. मात्र बचाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एक जण बुडालेल्या पैकी दोघेजण यात वाहून गेले. एकाचा मृतदेह सापडला असून दोघेजण बेपत्ता आहेत.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथक, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बुडालेल्यांचा तपास सुरू केला. दुपारपर्यंत एक मृतदेह सापडला. तर दोघांचा अद्याप तपास सुरू आहे.
दरम्यान, अक्कीवाट आणि बस्तवाड मार्गावर पुराचे पाणी आले आहे. शिरूर तालुक्यात पुरामुळे अनेकांचे हाल होत आहेत. अशातच ही मोठी दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. अक्कीवाटचे महिला सरपंच यांची पती सुहास पाटील यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.





