झारखंडमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोणाला किती जागा मिळणार ?

Jharkhand Assembly Election 2024 | झारखंड विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी 13 नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच झारखंडमधील राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षामध्ये जागा वाटपचा फॉर्म्यूला ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड मुक्ति मोर्चा (झामुमो) सर्वाधिक जागा लढणार आहे. झामुमोला 43 जागांवर आणि काँग्रेस 29 जागांवर मैदानात उतरणार आहे. राष्ट्रीय जनता दल (राजद) पाच तर भाकपाला चार जागांवर समाधान मानावे लागू शकते. झारखंडमधील जागा वाटपावर आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. Jharkhand Assembly Election 2024 |
2019 च्या विधानसभा निवडणुका
2019 च्या विधानसभा निवडणुकीत JMM ने 81 पैकी 30 जागा जिंकल्या, काँग्रेसने 16 आणि RJD ने एक जागा जिंकली. तिन्ही पक्षांनी बहुमताने आघाडी सरकार स्थापन केले. यंदा झारखंडमधील विधानसभेच्या 43 जागांवर 13 नोव्हेंबरला आणि 20 नोव्हेंबरला 38 जागांसाठी मतदान होणार आहे. या सर्व 81 जागांचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. Jharkhand Assembly Election 2024 |
हेही वाचा:
राजकीय सभांचा धडाका ! ‘शिवाजी पार्क’ मैदानासाठी 4 पक्षांमध्ये रस्सीखेच ; सर्व पक्षाकडून अर्ज दाखल





