झारखंडमधे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग
Updated On:

रांची – झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी प्रचाराने वेग घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात येत्या शनिवारी म्हणजेच 7 डिसेंबरला, आठ जिल्ह्यातल्या मिळून 20 मतदारसंघात तर, तिसऱ्या टप्प्यात येत्या 12 डिसेंबरला 17 मतदारसंघात मतदान होणार आहे.
भाजपा, झारखंड मुक्ती मोर्चा, झारखंड विकास मोर्चा आणि ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन हे प्रमुख पक्ष आपापल्या उमेदवारांसाठी जागोजागी प्रचारसभा घेत आहेत. चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख उद्या असून, तिथे येत्या 16 डिसेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी काल मतदान झाले. या टप्प्यात 64 . 44 टक्के मतदारांनी हक्क बजावला.
टॅग्स:





