मराठमोळ्या अभिनेत्याचा दाक्षिणात्य चित्रपटातील दमदार लुक समोर; पाहा फोटो

मुंबई – अभिनेता देवदत्त नागे (Devdatt Nage) याला ‘जय मल्हार’ या मालिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्याने साकारलेल्या खंडोबाच्या भूमिकेचे खूप कौतुक करण्यात आले. या मालिकेनंतर देवदत्तने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी सिनेसृष्टीत यश संपादन केल्यानंतर देवदत्तने दाक्षिणात्य सिनेसृष्टी पदार्पण केले आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्या या चित्रपटाची चर्चा रंगली होती. अखेर त्याच्या या चित्रपटातील लुक समोर आला आहे.
देवदत्तने त्याच्या आगामी तेलुगु चित्रपटातील त्याच्या लुकचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये त्याच्या गळ्यात रुद्राक्षच्या माळा आणि हातात शस्त्र असलेले दिसत आहे. तसेच पिळदार शरीरयष्टी केस आणि वाढलेल्या दाढीमध्ये देवदत्त अगदी दक्षिणायत्य चित्रपटातील हीरोसारखाच दिसत आहे. यात तो कामसाराजूची भूमिका साकारणार आहे. मात्र या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
View this post on Instagram
दरम्यान, याआधी देवदत्तने ‘ आदिपुरुष’ या चित्रपटात देखील हनुमानाची भूमिका साकारली होती. मात्र या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. याशिवाय त्याने ‘तान्हाजी’, ‘सत्यमेव जयते’ या बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.





