बांगलादेशात थंडीमुळे शाळांना सुटी…

नवी दिल्ली – बांगलादेशात सध्या थंडीची लाट सुरू आहे. तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास मदरशांसह सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. चुआडंगा हवामान वेधशाळेने एका दिवसात तापमानात लक्षणीय घट नोंदवली, तापमान काल सकाळी ९.५ अंश सेल्सिअसवरून आज ६.६ अंश सेल्सिअस, पर्यंत घससरले आहे. त्यामुळे सरकारने रहिवाशांना घरातच राहण्यास सांगितले.
चुआडंगा आणि सिराजगंज या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये 6.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, या हंगामात जिल्ह्यांमध्ये कमी तापमानाचा नवा विक्रम आहे. तापमानात कमालीची घट झाल्याने देशभरातील दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहेत.
बांगलादेश हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ढाका, राजशाही, रंगपूर आणि खुलना विभागातून हलक्या ते मध्यम थंडीच्या लाटा पसरत आहेत. देशाच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, असे ढाका येथील हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.





