पुणे जिल्हा | शिवजयंतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने निघणार

मंचर, (प्रतिनिधी) – अवसरी खुर्द, ता.आंबेगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात शिवजयंती उत्सवाची जय्यत तयारी केली आली आहे. पारंपरिक पद्धतीने अवसरी खुर्द गावातून मिरवणूक निघणार आहे.
शिवजयंतीनिमित्त रविवार, दि १८ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यात उद्घाटन समारंभ, शिवकलीन नानीप्रदर्शण, शाहिरी पोवाडा व स्पर्धांचे बक्षीस वितरण असेल आणि सोमवार, दि. १९ रोजी शिवजयंतीनिमित्त सकाळी भव्य मिरवणूक, पथकांचे प्रात्यक्षिक, शिवव्याख्यान व समारोपाच्या कार्यक्रमाने या सोहळ्याचा शेवट होईल. त्यासाठीचे पथकांचे सराव दररोज मैदानावर चालू आहेत. हा शिवजयंती उत्सव पूर्णत: पारंपरीक पद्धतीने साजरा केला जातो.
यात शारिरिक, बैद्धिक व सेवा, असे ३ विभाग येतात. शारीरिकमध्ये वेगवेगळी पथके, बौद्धिकमध्ये पथनाट्य, व्यवस्थापन, स्पर्धा आणि सेवामध्ये वेगवेगळे समाज ऊपयोगी सेवा कार्य वर्षभर घेत असतात. या शिवजयंतीची ओळख एवढी आहे की लांबून लांबून शिवप्रेमी ही शिवजयंती पाहण्यासाठी येत असतात. असा हा शिवजयंती उत्सव जल्लोशात पार पाडावा,यासाठी सर्व विद्यार्थी उत्साहात तयारी करत आहेत.





