मंचर, (प्रतिनिधी) – मंचर (ता.आंबेगाव) येथील अनुसया महिला पतसंस्थेचे कारभार चांगल्या पद्धतीने सुरू असून खेडेगाव सारख्या ठिकाणी महिलांनी पतसंस्था चालवणे कौतुकास्पद आहे. अनुसया महिला पतसंस्थेतून महिलांनी कर्ज घेतल्यास त्यातून व्यवसाय सुरू करा व उत्पन्नाचे साधन निर्माण करा, असे आवाहन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. मंचर (ता. आंबेगाव) येथील अनुसया महिला पतसंस्थेची अवसरी खुर्द येथील कवयित्री शांता शेळके सभागृह येथे बारावी वार्षिक सभा संपन्न झाली. संस्थेच्या अध्यक्षा किरण वळसे पाटील वार्षिक सभेच्या अध्यक्षा होत्या. देवेंद्रशेठ शहा,बाळासाहेब बेंडे पाटील,पूर्वा वळसे पाटील, डि. के. वळसे पाटील, नवनाथ निघोट, निलेश शेळके, उषा कानडे, जयश्री डोके, अरुणा थोरात, जेष्ठ नेते गणपतराव इंदोरे, मनीषा गावडे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गायत्री वायकर, संस्थेचे दैनदिन ठेव प्रतिनिधी, कर्मचारी, सभासद इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपाध्यक्षा वैशाली बेंडे, पूर्वा वळसे पाटील, उज्ज्वला गावडे, ज्योती शेंडे, ज्योती घोडेकर, सरस्वती शिंदे, सीता चासकर, पुष्पा वळसे पाटील, जयश्री रोकडे, पुष्पा जाधव, रूपाली झोडगे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झाले. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, अनुसया महिला पतसंस्थेचे काम उत्तम रित्या चालू असून संस्थेच्या ठेवी ११ कोटी १४ लाख असून कर्ज वाटप ९ कोटी १८ लाख आहे. खेळते भांडवल १३ कोटी ६३ लाख रुपये टप्पा पार केला आहे. ज्यावेळी अनुसया महिला पतसंस्थेची निर्मिती झाली. त्यावेळी बचत गटांची चळवळ सुरू होती. विविध बँकांकडून बचत गटाला कर्ज लवकर मिळत नव्हते. कागदपत्रे जमवा जमव करताना महिलांची दमछाक होत होती. मात्र, अनुसया पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना तात्काळ कर्ज मिळू लागले. किरण वळसे पाटील म्हणाल्या, गेली बारा वर्ष अनुसया महिला पतसंस्थेचे काम उत्तमरित्या सुरू असून आपल्या सर्व महिला, मुलींच्या सहकार्याने पतसंस्था वाढत आहे. पतसंस्थेला शरद बँकेच्या माध्यमातून वेळोवेळी मदत होत असते. पतसंस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ नेहमी मिळत असून तो शेवटपर्यंत आपल्याला टिकवून ठेवायचा आहे. त्यामुळे कर्ज घेतलेल्या महिलानी पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांना त्रास न देता वेळेत कर्ज भरावे. सूत्रसंचालन दीपा लोखंडे,अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी गायत्री वायकर ,आभार उपाध्यक्षा वैशाली बेंडे यांनी केले.