ऑगस्ट महिन्यात साडेपंधरा लाख लोकांचे रोजगार गेले, याला जबाबदार कोण?

Updated On:
ऑगस्ट महिन्यात साडेपंधरा लाख लोकांचे रोजगार गेले, याला जबाबदार कोण?

मुंबई – सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने देशाचा बेरोजगारीचा आकडा नुकताच प्रसिद्ध केला असून त्यानुसार सुमारे साडे आठ टक्क्यांनी बेरोजगारी वाढली आहे. हा आकडा धक्कादायक आहे. ऑगस्ट महिन्यात साडेपंधरा लाख लोकांचा रोजगार गेला आहे. याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी मोदी सरकारला केला आहे.

सुरुवातीपासूनच केंद्रातील मोदी सरकारचे धोरण लोकांना रोजगार मिळण्यास अनुकुल राहिलेले नाही. केंद्र सरकारने नोटबंदी केली, जीएसटी करप्रणाली आणली पण उद्योगधंद्यांना जी चालना मिळायला हवी होती ती मिळाली नाही आणि परिणामी देशात बेरोजगारीने उच्चांक गाठला, असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.

दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असे सांगणारे मोदी सरकार रोजगार देण्यात अपयशी ठरले आहेच शिवाय लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नही सोडवू शकलेले नाही ही वास्तविकता समोर आली असल्याचे महेश तपासे म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

Murli Manohar Joshi : पारदर्शक नोकरशाही ही लोकशाहीची गरज; मुरली मनोहर जोशींनी व्यक्त केले मत

2026-10-08 17:22:34

Murli Manohar Joshi : पारदर्शक नोकरशाही ही लोकशाहीची गरज; मुरली मनोहर जोशींनी व्यक्त केले मत

Rahul Gandhi : राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी; नितीन नवीन यांचा हल्लाबोल

2026-10-08 16:00:09

Rahul Gandhi : राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी; नितीन नवीन यांचा हल्लाबोल

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

2026-10-08 13:32:59

Wagholi News: शिक्षक-पदवीधर निवडणुकांपूर्वी वाघोलीत राजकीय नियम धाब्यावर? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं