थोड्याच वेळात माउलींचे पंढरीकडे प्रस्थान
Updated On:

आळंदी – माउलींची पालखी ठीक दुपारी १ वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. यंदा करोनामुळे 48 दिवस पायी चालणारा वारकरी केवळ आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरीत दाखल होणार आहे.
यंदा केवळ 20 वारकऱ्यांना पंढरीला जाण्याची मुभा देण्यात आली आहे. माऊलींच्या पादुका या शिवशाही बसने नेणार आहे. बसला सकाळी सुवासिक फुलांनी सजविण्यात आले. त्याचबरोबर बसला संपूर्णपणे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. केवळ मंदिरात लगबग सुरू असून संपूर्ण आळंदी सुनीसुनी आहे.
सकाळी नित्याच्या पूजानंतर माऊलींच्या चल पादुकांवर दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित मोजक्याच वारकऱ्यांनी ज्ञानोबा-तुकोबा-विठोबाचा गजर केला.
- माऊलींच्या चलपादुकांचे पूजन
- पंढरीकडे माऊलींच्या पादुका घेऊन मार्गस्थ होणाऱ्या लाल परीची पुष्पगुच्छ यांनी सजावट करताना कारागिर.
- संपूर्ण एसटी बस सॅनेटायझिंग करताना महिला कर्मचारी
- गांधी परिवारातर्फे माऊलींची पालखी पंढरीकडे मार्गस्थ झाल्यानंतर सर्व आळंदीकर यांना स्नेहभोजन दिले जाते स्वयंपाकाची तयारी करताना महिला.
- उपस्थित मोजक्याच वारकऱ्यांनी केला ज्ञानोबा तुकोबा विठोबाचा गजर










