Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी ‘त्या’ प्रश्नावरून राहुल यांच्यावर केला पलटवार; केजरीवाल यांनाही लगावला टोला, नेमकं काय म्हणाले पंतप्रधान?

नवी दिल्लीः लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आपले मतं मांडलं होतं. महाराष्ट्रात झाेलेल्या विधानसभेच्या निवडणूकी दरम्यानच्या काळात वाढलेले मतदार, सीमाप्रश्न, जम्मू काश्मीर आदी मुद्दे उपस्थित केले होते. पंतप्रधान मोदींनी काल या सर्व मुद्यांवरून राहुल यांच्यावर जहरी टीका केली. मोदींच्या ४० मिनिटांच्या भाषणात त्यांनी राहुल गांधी आणि दिल्लीचे मा. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले होते.
आम्ही संविधान जगणारी माणसं आहोत , खिशात संविधान घेऊन फिरणारे नाही असा खोचक टोल मोदींनी राहुल यांना लगावला. तसेच शीशमहलाचा उल्लेख करत मोदींनी केजरीवाल यांना लक्ष्य केले. सरकारने कशी बचत केली आणि तो निधी शीशमहलसाठी नाही तर लोकांच्या विकासासाठी वापरला असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
नक्षलवादाची भाषा खुलेपणाने बोलतात त्यांना संविधान काय समजणार?
राहुल यांनी शहरी नक्षलवादाचा प्रश्न उपस्थित करत मोदींना अनेक प्रश्न विचारले होते. यावर मोदींनी काही लोक शहरी नक्षलवादाची भाषा खुलेपणान बोलत आहेत. हे लोक संविधान काय समजणार असा प्रतिप्रश्न मोदींनी राहुल यांना केला. जम्मू काश्मीर आणि लडाख संविधानाच्या अधिकारापासून वंचित होते. हा अन्याय नव्हता का? आम्ही ३७० कलम हटवला. त्या दोन्ही राज्यांना देशातल्या लोकांप्रमाणेच अधिकार आणि हक्क मिळत असल्याचे मोदींनी सांगितले.
केजरीवाल यांनाही केले लक्ष्य
आज दि. ५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकीत शीशमहलाचा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला. मागच्या दहा वर्षांत घोटाळा न झाल्याने जे लाखो रुपये वाचले आहेत, ते आम्ही जनतेच्या सेवेसाठी वापरले आहेत. ज्या पैशांची बचत झाली त्यातून आम्ही लोक कल्याणाच्या योजना आणल्या. त्या पैशांचा वापर शीशमहल बनवण्यासाठी केला नसल्याचे म्हणत मोदींनी केजरीवाल यांना टोला लगावला. दिल्लीत अनेक जागा अशा आहेत जिथे अनेक कुटुंबांनी त्यांची संग्रहालयं उभारली असल्याचे मोदींनी नमूद केले.
यंदाची निवडणूक आपचे भविष्य ठरवणार
आज दि ५ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणूक होत आहेत. भाजप आप आणि काँग्रेस अशी मुख्यत्वे तिहेरी लढत येथे पाहिला मिळणार आहे. या निवडणुकीत दिल्लीमधील स्थानिक मुद्यांवर या पक्षांच्या नेत्यांनी सवाल उपस्थित करत आम्हीच हे प्रश्न सोडवू शकतो असे दिल्लीकरांना आश्वासन दिले आहे. भाजपकडून दिल्ली काबीज करण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. त्यामुळे दिल्लीकर पुन्हा कजेरीवालांना आपला पसंती देतात की भाजपला का काँग्रेस हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.





