पुणे जिल्हा | चिंबळीत 15 दिवसांत विद्युत तार तीनवेळ तुटली

चिंबळी, (वार्ताहर) – चिंबळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा परिसरात महावितरणची विद्युत तार 15 दिवसांत तीनवेळा तुटल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तर अनेक घरातील किमती साहित्य जळून खाक झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर शाळेसमोरच वीजतार तुटून पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.
महावितरणने त्वरीत याची दखल घेऊन खराब झालेल्या विद्युततारा नवीन टाकण्यात यावी अशी मागणी खेड तालुका कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनुराग जैद यांनी केली आहे.
या संदर्भात महावितरणचे कर्मचारी गायकवाड याच्यांशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की, गावठाण हद्दीतील असलेल्या डिपीवर लोड जास्त असल्यामुळे तारा तुटतात व फ्युईज जात आहेत हे काम महावितण कार्यालयाचे आहे तरी देखील दोन दिवसांत नविन तारा टाकण्याचे काम करण्यात येणार आहेत असे गारगोटे यांनी सांगितले असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच ठेकेदार विरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एलटी लइनची समस्या असल्याने तारा तुटत आहे.





