इम्रान खानची पत्नी करते काळी जादू; पतीची सत्ता वाचवण्यासाठी हजारो कोंबड्यांचा बळी

इस्लामाबाद:पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची संकटात असतानाच त्यांची तिसरी पत्नी बुशरा बिबी सुद्धा चर्चेत आहे. आपल्या पतीची सत्ता वाचवण्यासाठी बुशरा बिबीने काळ्या जादूचा सहारा घेतला असून, इम्रान खान यांच्या निवासस्थानाच्या परिसरात तिने हजारो कोंबड्यांचा बळी दिल्याची चर्चा सध्या पाकिस्तानमध्ये रंगली आहे.
इमरान खान यांची तिसरी पत्नी असलेली बुशरा बिबी नेहमीच चर्चेत राहिली असून तिच्याभोवती एक गूढ आणि रहस्यमय असे वलय आहे. पूर्वीही तिच्यावर काळी जादू केल्याचे आरोप अनेक वेळा ठेवण्यात आले आहेत. इमरान खान यांच्या बनियला येथील अधिकृत निवासस्थानमध्ये बुशरा बिबीने गेल्या काही दिवसांमध्ये हजारो टन मास जाळल्याचा आरोप विरोधी पक्षनेते शहाबाद शरीफ यांनी केला आहे.
पाकिस्तानमधील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता इम्रान खान यांची खुर्ची वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. असे मानले जाते पण बुशरा बिबीने आपल्या परीने प्रयत्न चालू ठेवले आहेत. पाकिस्तानमधील प्रख्यात वट्टू या खानदानआतून आलेली बुशरा बिबी ने 2018 मध्ये इम्रान खान यांच्याशी विवाह केला होता.
1974 सालि जन्माला आलेल्या बुशरा बिबीचे पहिले लग्न 1989 सालि झाले होते आणि तिला आपल्या पहिल्या पतीपासून पाच मुले आहेत. बुशरा बीबी संप्रदायाला मानते आणि इम्रान खान या संप्रदायाकडे आकर्षित झाल्यानंतर दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.





